Aadhar Card: आता बायोमेट्रिक्सशिवाय बनेल आधार कार्ड! कसा कराल यासाठी अर्ज? वाचा महत्वाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card:- आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र असून कुठल्याही शासकीय किंवा अशासकीय कामांकरिता तुम्हाला आधार कार्ड लागते. ओळखीचा पुरावा व इतर महत्त्वाच्या गोष्टीसाठी आधार कार्ड बंधनकारक म्हणजेच अत्यावश्यक करण्यात आलेले आहे.

आपल्याला माहित आहे की  आधार कार्ड जारी करताना हाताच्या बोटांची ठसे म्हणजेच फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅनिंग म्हणजेच आयरिश स्कॅन करणे गरजेचे असते.

परंतु यामध्ये बरेच व्यक्तींचे बोटांचे ठसे व्यवस्थित येत नाही म्हणजेच ते अस्पष्ट येतात किंवा बऱ्याच व्यक्तींना हात नसतात व अशावेळी खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून लोकसभेमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली ती खूप दिलासादायक अशी आहे.

 आधार कार्ड बनवण्यासाठी नाही आता बायोमेट्रिक्सची गरज

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. लोकसभेमध्ये केंद्र सरकारने माहिती दिली होती की 29 लाख लोकांना बायोमेट्रिक तपशीला शिवाय आता आधार कार्ड जारी करण्यात आलेले असून तुम्हाला आता फिंगरप्रिंट आणि आयरिश स्कॅन शिवाय आधार कार्ड बनवणे शक्य झाले आहे.

 बायोमेट्रिक शिवाय आधार कार्ड साठी कोणते व्यक्ती अर्ज करू शकतात?

बायोमेट्रिक्स शिवाय आधार कार्डसाठी अर्ज करण्याकरिता संबंधित व्यक्तीकडे वैध वैद्यकीय कारण असणे तितकेच गरजेचे आहे. म्हणजेच तुमचे बोटांचे ठसे अस्पष्ट असतील किंवा उमटत नसतील, संबंधित व्यक्तीला हात नसेल तर तुम्ही त्या संबंधीचे वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन आधार कार्ड करीता अर्ज करू शकतात.

डोळ्यांच्या बाबतीत बोलायचे झाले म्हणजे तुमचे डोळे खराब असतील किंवा तुमचे डोळेच नसतील तर अशा परिस्थितीत देखील तुम्ही आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात.याबाबत अस्पष्ट बोटांचे ठसे किंवा डोळे आणि हात नसणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना आधार कार्ड देण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना सरकारने प्रत्येक आधार सेवा केंद्राला दिले आहेत

व या संबंधीची महत्त्वपूर्ण घोषणा मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केलेली आहे. यामध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की जर एखाद्या व्यक्तीचे बोटांचे ठसे अस्पष्ट असतील तर तो फक्त आयरिस स्कॅनच्या  माध्यमातून आधार कार्ड बनवू शकतो. जर एखाद्या व्यक्तीकडे आयरिश स्कॅन नसेल तर ते फिंगरप्रिंटच्या माध्यमातून देखील आधारसाठी अर्ज करू शकतात.

यासाठी कसा करावा अर्ज?

यामध्ये सरकारने सांगितले आहे की, एखादा व्यक्ती फिंगरप्रिंट आणि आयरिश स्कॅन बायोमेट्रिक्स दोन्हीही देऊ शकत नसेल तरी देखील आधारसाठी अर्ज करू शकतात. असे व्यक्ती नाव, लिंग तसेच पत्ता आणि तारखेनुसार आधारसाठी अर्ज करू शकतात. परंतु त्यांना त्यांच्या हाताचे आणि डोळे सक्षम नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे गरजेचे असते. तसेच महत्त्वाचे म्हणजे अपंगत्वाचा फोटो आधार केंद्रावर जमा करावा लागतो.

अशाप्रकारे आता संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींना बायोमेट्रिक शिवाय आधार कार्डसाठी अर्ज करता येणे शक्य आहे.