Bank Holidays May: अवघ्या काही दिवसात एप्रिल महिना संपणार आहे आणि आपण सर्वजण मे महिन्यात प्रवेश करणार आहे.
यातच आम्ही तुम्हाला सांगतो आता मे महिन्यात एकूण 11 दिवस बँका बंद राहणार आहे . तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या मे महिन्यात असणाऱ्या सुट्ट्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. यामुळे बँकेतील व्यवहाराशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास ते त्वरित पूर्ण करून घ्या.
आरबीआयच्या बँकिंग हॉलिडे कॅलेंडरनुसार मे महिन्यात प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांसह बँका एकूण 11 दिवस बंद राहतील. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. मे महिन्याच्या सुट्ट्या 1 मे रोजी May Day पासून सुरू होणार आहेत. आसाम, बिहार, गोवा, कर्नाटक, केरळ, मणिपूर, पुद्दुचेरी, तेलंगणा, तामिळनाडू, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये सरकारी आणि खाजगी बँका या दिवशी बंद राहतील. त्याचबरोबर या महिन्याची शेवटची सुट्टी रविवारी असणार आहे.
1 मे – मे दिवस/महाराष्ट्र दिन (सोमवार) – आसाम, बिहार, गोवा, कर्नाटक, केरळ, मणिपूर, पुडुचेरी, तेलंगणा, तामिळनाडू, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल
5 मे – बुद्ध पौर्णिमा (शुक्रवार) – दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, आसाम, बिहार, गुजरात, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड
7 मे – रविवार – राष्ट्रीय सुट्टी
9 मे – रवींद्रनाथ टागोर यांचा वाढदिवस (मंगळवार) – पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.
13 मे – दुसरा शनिवार – राष्ट्रीय सुट्टी
14 मे – रविवार – राष्ट्रीय सुट्टी
16 मे (मंगळवार) – राज्यत्व दिन – सिक्कीम
21 मे – रविवार – राष्ट्रीय सुट्टी
22 मे – महाराणा प्रताप जयंती – सोमवार – हिमाचल प्रदेशात बँका बंद राहतील.
27 मे – चौथा शनिवार – राष्ट्रीय सुट्टी
28 मे – रविवार – राष्ट्रीय सुट्टी
बँका सुट्टीच्या दिवशी कार्यरत राहतील, परंतु ऑनलाइन सेवा सुरू राहतील. यासोबतच एटीएममध्ये उपलब्ध असलेल्या सेवाही पूर्णपणे सुरू राहतील. कोणत्याही एटीएममध्ये जाऊन तुम्ही सहज पैसे काढू शकता.
हे पण वाचा :- OnePlus 11 5G : संधी सोडू नका ! 25 हजारांच्या डिस्कॉउंटसह घरी आणा OnePlus चा ‘हा’ भन्नाट 5G स्मार्टफोन