भारत

Bikes Under 80k Budget : स्वस्तात उत्तम फीचर्स देतात या 5 शक्तिशाली बाईक्स! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Bikes Under 80k Budget : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे ऑटो क्षेत्रातील वाहनांच्या किमती देखील अधिक वाढत आहे. सध्या कार आणि बाईकच्या किमती खूपच वाढल्या आहेत. जर तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ५ बाईक सर्वोत्तम पर्याय आहेत.

नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या आर्थिक वर्षात अनेक वस्तू महाग झाल्या आहेत तर काही वस्तू स्वस्त देखील झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी जी बाईक ५० हजार रुपयांना मिळत होती त्याच बाईकची किंमत सध्या १ लाख रुपये झाली आहे.

सर्वसामान्य नागरिकांना बाईक खरेदी करायची असेल तर ते कमी बजेटमध्ये सर्वोत्तम फीचर्स असणारी बाईक शोधत असतात. अनेकजण ८० हजार रुपयांच्या बजेटमध्ये बाईक शोधत असतात. त्यांच्यासाठी आज ५ बाईकबद्दल माहिती देणार आहोत.

बजेटमधील या 5 बाइक्स आहेत

बजाज पल्सर

बजाज कंपनीच्या अनेक बाईक सध्या लोकप्रिय आहेत. जर तुम्हाला कमी बजेटमधील बाईक घेईची असेल तर तुम्ही बजाज पल्सर 125 या बाईकचा पर्याय निवडू शकता. या बाईकमध्ये 124.4 cc इंजिन देण्यात आले आहे जे 11.64 Bhp पॉवर आणि 11 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकची किंमत 75,000-1,00,000 रुपये आहे.

Hero Glamour

हिरो कंपनीची Glamour ही बाईक देखील ग्राहकांना अधिक आवडत आहे. या बाईकमध्ये 125 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 0.7 bhp पॉवर आणि 10.6 Nm टॉर्क निर्माण करते. तसेच या बाईकची किंमत 80,000 रुपये आहे.

TVS Apache RTR 160 4V

ही 159.7 cc इंजिन असलेली एक स्पोर्टी कम्युटर बाइक आहे जी 16.02 bhp पॉवर आणि 14.12 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकची किंमत सुमारे 80,000 ते 1 लाख रुपये आहे.

Suzuki Gixxer

ही एक सुझुकी कंपनीची स्पोर्टी कम्युटर बाईक आहे. या बाईकमध्ये 155 cc इंजिन देण्यात आले आहे जे 13.4 bhp पॉवर आणि 13.8 Nm टॉर्क निर्माण करते. Suzuki Gixxer या बाईकची किंमत 80,000 रुपये आहे.

Honda Shine

होंडा कंपनीची ग्राहकांना अधिक पसंत असलेल्या बाईक पैकी होंडा shine ही एक बाईक आहे. जी 123.94CC इंजिनद्वारे समर्थित आहे जी 10 bhp पॉवर आणि 11 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईक ची किंमत 80,000 रुपये आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts