भारत

Black Thread : शरीरावर काळा धागा बांधण्याचे फायदे काय? का बांधतात काळा धागा? जाणून घ्या सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Black Thread : रोजच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही अनेकांच्या शरीरावर काळा धागा बांधल्याचे पाहिले असेल. पण तसेच तुम्हीही तुमच्या शरीरावर काळा धागा बांधला असेल. पण यामागचे तुम्हाला कारण माहिती आहे का? नाही तर आज जाणून घ्या…

काळा धागा बांधण्याची प्रथा ही फार जुनी आहे. अनेकदा तुम्ही मुलींच्या पायात तसेच मुलांच्या कंबरेला काळा धागा बांधल्याचे पाहायला मिळते. तसेच पुरुष गळ्यामध्ये देखील काळा धागा बांधत असतात.

पूर्वीपासून असे मानले जाते की काळा धागा बांधल्यानंतर सकारात्मक परिणाम मिळतात आणि कोणाची वाईट नजर जात नाही. तसेच आरोग्याला देखील फायदा होतो. तसेच यामागे अनेक फायदे देखील आहेत.

कोणत्या राशीच्या लोकांनी काळा धागा घालू नये

काही राशीच्या लोकांना काळा धागा घालणे धोक्याचे मानले जाते. त्यामुळे मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी चुकूनही काळा धागा घालू नये. कारण या दोन्ही राशींचा स्वामी मंगल देव आहे. मान्यतेनुसार मंगल देव यांना काळा रंग अजिबात आवडत नाही. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी काळा धागा घातल्यास लाभापेक्षा नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.

काळ्या धाग्याचे फायदे

शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गळ्यात किंवा हातात काळा धागा बांधणे शुभ असते.
काळा रंग शनि ग्रहाशी संबंधित मानला जातो. अशा प्रकारे धारण केल्याने कुंडलीत शनीची स्थिती मजबूत होते.
काळा धागा धारण केल्याने नकारात्मक शक्ती दूर राहते.
काळा धागा धारण केल्याने कोणाची वाईट नजर जात नाही.
जर तुम्ही एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असाल तर उपचारासोबतच कंबरेभोवती काळा दोरा बांधा. यामुळे तब्येत सुधारण्यास सुरुवात होईल.
काळा रंग शनि ग्रहाशी संबंधित मानला जातो. अशा प्रकारे धारण केल्याने कुंडलीत शनीची स्थिती मजबूत होते.

शरीराच्या कोणत्या भागात काळा धागा बांधणे शुभ असते?

मान्यतेनुसार तुमच्या पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधला तर तुमच्यावर कोणाचीही वाईट नजर पडणार नाही. तसेच तुमच्यापासून नकारात्मक शक्ती दूर राहील.
जर तुम्ही सतत आजारी असाल तर तुम्ही तुमच्या कंबरेला काळा धागा बांधून आजारापासून मुक्तता मिळवू शकता.
जर तुम्ही संकटामध्ये असाल आणि तुम्हाला कोणाकडूनही मदत मिळत नसेल तर तुम्ही हातामध्ये काळा धागा बांधा.
जर शत्रू तुम्हाला त्रास देत असतील तर काळ्या धाग्याने हाताला बांधावे. यामुळे तुमचे शत्रू पराभूत होतील.
गरोदर महिलांनी काळ्या धाग्याच्या ७ गाठी बांधून पायात घालाव्यात. असे मानले जाते की असे केल्याने गरोदरपणातील वेदनांपासून आराम मिळतो.
शनीची वाईट नजर टाळण्यासाठी गळ्यात काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शनिमुळे होणारा त्रास बऱ्याच अंशी कमी होतो.

Ahmednagarlive24 Office