उन्हाळ्यातील गर्मीत फिरा झारखंडमधील काश्मीर! झारखंड मधील ‘हे’ ठिकाण सिमला आणि मनालीला देखील पाडते फिके

Ajay Patil
Published:
patratu velley zharkhand

भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये अनेक प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे असून त्यातील काही पर्यटन स्थळे ही थंड हवेचे ठिकाणे म्हणून देखील खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये  प्रचंड असणाऱ्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळावा याकरिता अनेक जण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंब किंवा मित्रांसोबत देशातील किंवा राज्यातील एखाद्या थंड हवेच्या किंवा हिल स्टेशनसारख्या ठिकाणी ट्रिप प्लॅन करतात.

जर आपण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये देखील अनेक हिल स्टेशन आहेत. त्या व्यतिरिक्त संपूर्ण देशातील अनेक राज्यांमध्ये देखील खूप प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये जर तुम्ही झारखंड मधील एका पर्यटन स्थळाबद्दल माहिती घेतली तर ते  काश्मीर, सिमला आणि मनालीपेक्षा कमी नाही. विशेष म्हणजे या ठिकाणाला झारखंडचे काश्मीर असे देखील म्हटले जाते व या ठिकाणाचे नाव आहे पत्राटू व्हॅली हे होय.

 पत्राटू व्हॅलीला म्हणतात झारखंडचे काश्मीर

पत्राटू व्हॅली हे झारखंड मधील प्रसिद्ध ठिकाण असून त्याला झारखंडचे काश्मीर असे म्हटले जाते. या ठिकाणी मे आणि जून सारख्या कडक उन्हाळ्याच्या कालावधीत देखील तापमान 15°c पेक्षा कमी असते. विशेष म्हणजे या कालावधीत देखील त्या ठिकाणी लोकांना ब्लॅंकेट घालून झोपावे लागते.

पत्राटू व्हॅली हे ठिकाण झारखंड राज्यांमध्ये रामगड जिल्ह्यात असून काही भाग रांची जिल्ह्यात देखील येतो. या ठिकाणी मनाला मंत्रमुग्ध करणारे सुंदर खोरे असून समुद्रसपाटीपासून हे ठिकाण 1300 फूट उंचीवर आहे. या ठिकाणी दूर दूर वरून पर्यटक भेट देण्यासाठी येतात.

तुम्हाला जर जंगल, सरोवरे आणि शांत वातावरण आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. जेव्हा तुम्ही या ठिकाणी भेट द्याल तेव्हा तुम्हाला स्वर्गासारखे वाटेल. या ठिकाणाचे सौंदर्य हे मनाली आणि शिमलापेक्षा कमी नाही.

म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दुर्मिळ असे स्थलांतरित पक्षी पाहण्याची संधी मिळते. या ठिकाणी असलेले वळणावळणाचे रस्ते आणि हिरवीगार जंगले पर्यटकांना भूरळ घालतात. विशेष म्हणजे पावसाळ्यात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात.

या ठिकाणचा सूर्यादय आणि सूर्यास्त पाण्यात आहे खरी मजा

पत्राटू व्हॅलीला भेट देण्याची मजा ही सर्व ऋतूंमध्ये वेगवेगळी असते. हिवाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात व ऑक्टोबर ते मार्च महिन्यामध्ये जास्त गर्दी होते. या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून 1300 मीटर असल्यामुळे हिवाळ्यात या ठिकाणी खूप थंड वातावरण असते.

परंतु फिरण्याकरिता हा कालावधी या ठिकाणी अनुकूल मानला जातो. उन्हाळ्यात या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात या ठिकाणाचा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी वाढते. या ठिकाणी जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळी असे वाटते की सूर्य आपल्यापासून उगवत आहे

आणि त्यासोबतच सूर्यास्ताचे देखील एक अतिशय सुंदर दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय या ठिकाणी अनेक पिकनिक स्पॉट असून आणि पर्यटक या ठिकाणी गॅस शेगडी आणि भांडी व इतर लहान वस्तू घेऊन सहलीला येतात व या ठिकाणी स्वयंपाक करून जेवणाचा देखील आस्वाद घेतात.

 पत्राटू व्हॅलीला कसे जाता येते?

हे ठिकाण झारखंडची राजधानी रांची  पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. समजा तुम्हाला जर विमानाने जायचे असेल तर सर्वात जवळचे विमानतळ बिरसा मुंडा विमानतळ आहे व या ठिकाणहून तुम्ही पत्राटूला थेट बस किंवा कॅबने जाऊ शकतात. तसेच तुम्हाला जर रेल्वेने जायचे असेल तर सर्वात जवळच्या रेल्वे स्टेशन रांची असून या ठिकाणाहून तुम्ही बस आणि ऑटो अशा पद्धतीने जाऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe