भारत

Electricity Bill : ऐकलं का… आता वीज बिल येणार निम्म्याहून कमी ! फक्त करा ‘हे’ काम

Published by
Ahmednagarlive24 Office

Electricity Bill : संपूर्ण देशात आज कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे प्रत्येकाच्या घरात विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे दरमहा वीज बिलही भरमसाठ येऊ लागले आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला या लेखात काही टिप्स सांगणार आहोत जे फॉलो करून तुम्ही दरमहा वीज बिलात हजारो रुपयांची बचत करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आज अनेक लोक या टिप्स फॉलो करत आहेत आणि याचा फायदा देखील त्यांना होत आहे.

स्वयंपाकघर चिमणी

उन्हाळ्यात आपण स्वयंपाकघरातील चिमणीचाही खूप वापर करतो. त्यामुळे विजेचा वापरही खूप वाढू लागतो. यामुळेच चिमणी वापरताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. गरज नसेल तर लगेच थांबवा. चिमणीच्या ऐवजी तुम्ही सामान्य पंखा देखील वापरू शकता, यामुळे विजेचीही बचत होईल.

इन्व्हर्टर एसी

उन्हाळ्यात एसी वापरतानाही तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. वीज बिलात बचत करण्यासाठी नॉर्मल एसीऐवजी इन्व्हर्टर एसीही वापरता येईल. पीसीबी इन्व्हर्टर एसीमध्ये बसवलेले आहे आणि ते वीज बचतीसाठी सर्वात उपयुक्त ठरते. यामुळेच आता जास्त एसी इनव्हर्टर येत आहेत आणि लोक त्याचा वापरही करू लागले आहेत.

गीझर

गीझरमुळे वीज बिल खूप जास्त येते. उन्हाळ्यात गिझरचा वापर जास्त होत नसला तरीही हिवाळ्याच्या हंगामात मोठ्या प्रमाणात याचा वापर होतो आणि वीज बिल जास्त येतो. गीझरची गरज नसतानाही तो चालू ठेवला जातो आणि त्यातून विजेचा वापर होत असल्याचे अनेक वेळा दिसून येते. आपण ते बंद करण्याची देखील काळजी घेतली पाहिजे. या टिप्स तुम्हाला वीज बिल कमी करण्यात खूप मदत करू शकतात.

हे पण वाचा :- IMD Rain Alert : पुन्हा धो धो .. 12 राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस ; जाणून घ्या ताजे अपडेट्स

Ahmednagarlive24 Office