एचडीएफसी खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, RD योजनेत गुंतवणूक केल्यास किती व्याज मिळणार ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Bank RD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. दुसरीकडे एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरमधील एक महत्त्वाची आणि मोठी बँक आहे.

एचडीएफसीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. एफडी योजना आणि आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना एचडीएफसी बँक चांगले व्याज देते. ग्राहकांना स्वस्त व्याजदरात गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज,

वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेच्या आरडी योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

HDFC आरडी योजनेसाठी किती व्याज देते ? :- मिळालेल्या माहितीनुसार, एचडीएफसी या प्रायव्हेट सेक्टर मधील बँकेकडून आरडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 4.50% पासून ते 7.10% पर्यंतचे व्याज दिले जात आहे. पण ज्येष्ठ नागरिकांना एचडीएफसीकडून आरडी योजनेत गुंतवणूक केल्यास अधिकचे व्याज दिले जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी जर एचडीएफसीच्या आरडी स्कीम मध्ये गुंतवणूक केली तर त्यांना 5 टक्क्यांपासून ते 7.75 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळते. सर्वसामान्य नागरिकांना एचडीएफसी बँकेकडून 15 महिन्याच्या आरडी योजनेसाठी 7.10 टक्के दराने व्याज ऑफर केले जात आहे.

म्हणजेच जर 15 महिन्याच्या आरडी योजनेत सर्वसामान्य नागरिकांनी पाच हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर 78,617 रुपये देऊ केले जाणार आहेत. तसेच एचडीएफसीकडून ज्येष्ठ नागरिकांना 90 आणि 120 महिन्यांचे आरडी योजनेतील गुंतवणुकीसाठी 7.75% एवढे व्याज दिले जात आहे.

जर सीनियर सिटीजन अर्थात ज्येष्ठ नागरिकांनी 120 महिन्यांच्या आरडी योजनेत पाच हजार रुपये प्रति महिना एवढी गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी वर 9 लाख 5 हजार 543 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.