New Railway Rule: 1 एप्रिलपासून रेल्वेने नियमांमध्ये केला मोठा बदल! घाईघाईत रेल्वेत चढलात आणि विना तिकीट प्रवास कराल तर…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Railway Rule:- भारतीय रेल्वे ही  वाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे साधन असून दररोज लाखोच्या संख्येने भारतीय रेल्वेने प्रवाशी प्रवास करतात. लांबचा प्रवास वेगात आणि कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे हे एक फायदेशीर वाहतुकीचे साधन आहे.

परंतु जर आपण भारतीय रेल्वे पुढील एक प्रमुख समस्या पाहिली तर दररोज मोठ्या संख्येने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील प्रचंड प्रमाणात आहे. रेल्वेने विना तिकीट प्रवास करणे हा दंडनीय अपराध आहे.

परंतु तरी देखील बरेच प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. परंतु आता भारतीय रेल्वे 1 एप्रिल पासून नियमामध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असून रेल्वेने विना तिकीट प्रवास करणे आता प्रवाशांना महाग पडू शकते.

 भारतीय रेल्वे 1 एप्रिल पासून नियमात करणारा हा बदल

भारतीय रेल्वेच्या माध्यमातून नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक एप्रिल पासून काही नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता असून या बदललेल्या नियमानुसार जर विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करताना जर पकडले गेले तर तुम्हाला आता ऑनलाईन दंड भरावा लागू शकतो.

कारण बऱ्याचदा एखादा प्रवासी विना तिकीट प्रवास करताना पकडला जातो व त्याच्याकडे त्यावेळी संबंधित प्रवाशाकडे रोख रक्कम नसते. परंतु आत्ता ऑनलाइन पद्धतीने दंड भरावा लागणार आहे.कारण आता रेल्वेच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू केली जाणार आहे.

म्हणजेच तुम्ही आता डिजिटल पेमेंट करून तुरुंगात जाण्यापासून स्वतःला वाचवू शकणार आहात. याकरिता रेल्वेचे जे काही तिकीट चेकर असतात त्यांना हॅन्डहोल्ड टर्मिनल मशीन देण्यात येणार आहे.बऱ्याचदा प्रवाशाकडे रोख रक्कम नसते आणि प्रवास करण्यासाठी जेव्हा प्रवासी स्टेशनवर येतो तेव्हा ट्रेन निघण्याच्या मार्गावर असते व असे प्रवासी तिकीट न काढता घाईघाईत ट्रेनमध्ये बसतात.

अशा प्रवाशांसाठी ही सुविधा खूप फायदेशीर ठरणार आहे. अशा प्रवाशांना आता हॅन्डहोल्ड टर्मिनल मशीनच्या माध्यमातून क्विआर कोड स्कॅन करून दंड भरता येणार आहे. त्यामुळे आता जर तुम्ही घाईघाईने ट्रेनमध्ये चढला असाल व तुमच्याकडे तिकीट नसेल तर टीसी तुम्हाला रेल्वेतून उतरू शकणार नाहीत. कारण तुम्ही आता या नवीन नियमानुसार ऑनलाईन दंड भरू शकणार आहात.

 रेल्वे काउंटर देखील करता येणार ऑनलाइन पेमेंट

तसेच जनरल तिकिटांच्या पेमेंट बाबत देखील आता एक एप्रिल पासून नवीन नियम लागू होणार आहे. कारण जनरल तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे व आता यामुळे कोट्यावधी प्रवाशांना याचा फायदा मिळणार आहे.

कारण एक एप्रिल पासून रेल्वेच्या जनरल तिकिटाच्या पेमेंट करता देखील डिजिटल पेमेंटला मान्यता देण्यात आलेली असून तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून जनरल रेल्वेचे तिकीट खरेदी करू शकणार आहात. ही सेवा एक एप्रिल 2024 पासून प्रवाशांसाठी सुरू होणार आहे