Lata Mangeshkar passes away लता मंगेशकर यांचे निधन !

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मोठी माहिती दिली आहे. त्यांनी गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती.

तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

आदल्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्याना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणि त्या सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्या.

लता (९२) यांना 8 जानेवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते, जिथे त्यांच्यावर डॉ. प्रतित समदानी आणि डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते.