Mahindra Bolero : महिंद्रा बोलेरो नव्या रूपात करणार कमबॅक! मिळणार किलर लूक आणि जबरदस्त फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahindra Bolero : महिंद्रा कंपनीकडून आता पुन्हा एकदा दमदार नवीन बोलेरो सादर केली जाणार आहे. महिंद्रा कॅम्पच्या एंक कार बाजारात धुमाकूळ घालत आहेत. मात्र आता कंपनीकडून अनेक कार नवीन रूपात सादर केल्या जात आहेत. नवीन कारला ग्राहकही चांगला प्रतिसाद देत आहेत.

नवीन महिंद्रा कारमध्ये कंपनीकडून अनेक बदल करण्यात आले आहेत. लूक आणि फीचर्समध्ये अनेक बदल तुम्हाला दिसतील. कंपनीकडून येत्या नवीन वर्षात नवीन श्रेणीतील SUV कार तयार करण्याचा विचार करण्यात येत आहे.

महिंद्रा कंपनीची सर्वाधिक विक्री होत असलेली Scorpio ही कार देखील वर्षाच्या अखेरीस नवीन Scorpio SUV जनरेशन मॉडेल लॉन्च करणार आहे. तसेच कंपनीकडून २०२४ पर्यंत नवीन बोलेरो लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंजिन

नवीन महिंद्रा बोलेरो 1.5-लिटर, 3-सिलेंडर डिझेल इंजिनसह लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. या कारचे इंजिन 3600 RPM वर 75 अश्वशक्ती आणि 1600 आणि 2200 RPM दरम्यान 210 Nm उत्पादन करते. बोलेरो 23.52 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते. डिझेल इंजिन सुमारे 14 kmpl च्या मायलेजसह इंधन कार्यक्षम आहे.

बोलेरोमध्ये मोठे बदल होणार

पुढील वर्षात जानेवारी २०२४ मध्ये कंपनीकडून महिंद्रा बोलेरो लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीकडून याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हेडलॅम्पची रचना तशीच राहिली आहे परंतु आतील बाजूस काही बदल आहेत.

कंपनी या नवीन एसयूव्हीमध्ये नवीन फीचर्स देखील जोडू शकते, ज्यामध्ये बदललेला डॅशबोर्ड आणि अपहोल्स्ट्री आढळू शकते. याशिवाय नवीन फीचर्स आणि बदललेली केबिन नवीन महिंद्रा बोलेरोमध्ये मिळू शकते. ABS, EBD, पार्किंग सेन्सर्स आणि स्पीड अलर्ट सारखी वैशिष्ट्ये देण्यात येतील.

किंमत

कंपनीकडून नवीन महिंद्रा बोलेरो कारबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र या कारची अंदाजे किंमत १५ लाख असू शकते. वेगवेगळ्या मॉडेलनुसार ही किंमत बदलू शकते.