भारतात दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात व जास्त करून लांब पल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. जर लांबचा प्रवास करायचा असेल तर प्रवासी अगोदरच रिझर्वेशन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रवासाचा दिवस उजाडतो तरीदेखील तिकीट कन्फर्म होत नाही.
मग अशावेळी जनरल कोच मधून प्रवास करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. रेल्वेच्या जनरल डब्यांमध्ये देखील प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते व बऱ्याचदा जनरल तिकीट बुक करायला देखील खूप मोठ्या प्रमाणावर समस्या उद्भवतात.
परंतु आता रेल्वेने यावर एक नामी उपाय काढला असून प्रवासी आता युटीएस ऑन मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे भारतातील कुठूनही कोणत्याही स्टेशनचे जनरल म्हणजे सामान्य प्रवास तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुक करू शकणार आहेत. या अगोदर तुम्हाला जर जनरल म्हणजेच अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुक करायचे असेल तर ते तुमच्या मोबाईल स्थानावरून विस किमीच्या परिघात येणाऱ्या स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांसाठी करता येत होते.
परंतु नुकतेच प्रवाशांच्या सोयीकरिता रेल्वेने तिकीट बुकिंगची ही बाह्यमर्यादा काढून टाकली व त्यामुळे आता भारतातील कोणत्याही स्टेशनचे तिकीट तुम्ही कुठूनही बुक करू शकतात. परंतु यामध्ये जिओ फेन्सिंगच्या अंतर्गत हद्दीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून प्रवाशांना फक्त स्टेशन बाहेरून हे तिकीट काढता येणार आहे.
युटीएस एप्लीकेशनद्वारे जनरल प्रवासाचे म्हणजेच अनारक्षित तिकीट कसे बुक करावे?
1- सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये यूटीएस एप्लीकेशन डाउनलोड करून ते इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर आणि नाव व इतर तपशील भरून या एप्लीकेशनमध्ये स्वतःचे अकाउंट तयार करा.
2- खाते तयार झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा किंवा पासवर्ड ऐवजी तुम्ही ओटीपी पर्यायाची निवड करून देखील लॉगिन करू शकतात.
3- त्यानंतर प्रवास तिकीट हा पर्याय निवडावा.
4- त्यानंतर त्यामध्ये पेपरलेस तिकिटाचा पर्याय निवडा.
5- निर्गमन स्टेशन आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे म्हणजेच गंतव्य स्टेशनचे नाव टाका.
6- त्यानंतर तुम्हाला गेट फेयर पर्यायावर टॅब करावे लागेल.
7- नंतर विचारलेल्या सगळ्या तपशिलांची पुष्टी करा आणि वॉलेट किंवा इतर पेमेंटचा पर्याय वापरून पेमेंट करा.
8- तेव्हा तुम्ही पेमेंटची प्रक्रिया पूर्ण कराल तेव्हा तुमचे तिकीट तुम्हाला त्या ठिकाणी दिसायला लागेल.
यूटीएस एप्लीकेशन द्वारे प्लॅटफॉर्म तिकीट कसे बुक करावे?
1- याकरिता देखील अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये यूटीएस एप्लीकेशन नसेल तर ते डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे.
2- तुमचे मोबाईल नंबर आणि नाव आणि इतर महत्त्वाची माहिती भरून युटीएस एप्लीकेशनमध्ये स्वतःच्या अकाउंट तयार करावे.
3- त्यानंतर अकाउंट तयार झाल्यावर मोबाईल नंबर आणि पासवर्ड किंवा ओटीपी चा वापर करून लॉगिन करावे.
4- लॉगिन केल्यानंतर त्या ठिकाणी असणारा प्लॅटफॉर्म तिकीट हा पर्याय निवडावा.
5- नंतर पेपरलेस तिकिटाचा पर्याय निवडावा.
6- हा पर्याय निवडल्यानंतर पुढे स्टेशनचे नाव आणि प्रवासी क्रमांक एंटर करावा आणि बुक तिकीटवर टॅप करावे.
7- त्यानंतर पेमेंट करण्यासाठी अन्य पेमेंट पर्याय किंवा वॉलेटचा वापर करून पेमेंट करावे.
8- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे तिकीट त्या ठिकाणी दिसायला लागेल.