Ola Electric Scooter : ओलाने लॉन्च केली कमी बजेटवाली इलेक्ट्रिक स्कूटर; सिंगल चार्जमध्ये 125 किमी रेंज आणि बरेच काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ola Electric Scooter : देशात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत मात्र ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरने वर्चस्व गाजवले आहे. कारण ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरला बाजारात प्रचंड मागणी आहे. तसेच ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये सर्वाधिक रेंज देत आहे.

ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक नवनवीन फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच ही स्कूटर मजबूत आणि सिंगल चार्जमध्ये अधिक रेंज देते. त्यामुळे ग्राहकही या स्कूटरकडे चांगलेच आकर्षित होत आहेत.

ओला कंपनीकडून नुकत्याच दोन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केल्या आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच किंमतही कमी ठेवण्यात आली आहे.

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची श्रेणी आणि वैशिष्ट्ये

या इलेक्ट्रिक स्कूटरला 2kWh बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर 91 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 8.5kW ची इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे.

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरचे तशी स्पीड 90 किलोमीटर आहे. या स्कूटर ची किंमत इतर स्कूटरपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. S1 च्या नवीन व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

ओला S1 एअर नवीन व्हेरिएंट इलेक्ट्रिक स्कूटर श्रेणी आणि वैशिष्ट्ये

Ola S1 Air मध्ये 2kWh चा बॅटरी बॅकअप आहे जो एका चार्जवर 85 किलोमीटर पर्यंत रेंज देते. मात्र कंपनीकडून या इलेक्ट्रिक स्कूटरचे मॉडेल अपग्रेड करण्यात आले आहे, ज्यामध्ये 3kWh बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. जे एका चार्जमध्ये 125 किलोमीटरची रेंज देईल. S1 Air च्या नवीन व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आहे.