Ram Mandir In India: अयोध्या व्यतिरिक्त भारतात ‘या’ ठिकाणी आहेत श्रीरामाचे प्रसिद्ध मंदिरे! आध्यात्मिक दृष्ट्या आहे विशेष महत्त्व

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ram Mandir In India:- बरेच व्यक्ती हे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक पर्यटनासाठी जातात. यामध्ये विविध हिल स्टेशन तसेच थंड हवेच्या ठिकाणांना भेट देण्याला प्राधान्य दिले जाते. परंतु काहीजण या व्यतिरिक्त अध्यात्मिक पर्यटनाला प्राधान्य देतात व अनेक वेगवेगळ्या ठिकाणची मंदिरे व अध्यात्मिक ठिकाणांना भेटी देतात.

आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून  चारधाम यात्रेपासून तर भारतातील ज्योतिर्लिंग दर्शन तसेच विविध ठिकाणचे मंदिरे व आता खास करून अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या रामलल्लाच्या दर्शनासाठी देखील तितकीच गर्दी होताना दिसून येत आहे.

यावर्षी रामनवमीला देखील अयोध्या मध्ये खूप मोठी गर्दी भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी झालेली पाहायला मिळाली. तुम्हाला माहिती आहे का की अयोध्या येथे असलेल्या राम मंदिरा व्यतिरिक्त भारतामध्ये  काही ठिकाणी देखील श्रीरामांची भव्य अशी मंदिरे आहेत. तसेच या ठिकाणी श्रीरामांच्या संबंधित बऱ्याच घटना निगडित आहेत. त्यामुळे या लेखात आपण अशाच भारतातील काही प्रसिद्ध राम मंदिरांची माहिती घेणार आहोत.

 भारतातील प्रसिद्ध रामाचे मंदिर

1- रघुनाथ मंदिर,जम्मू जम्मू येथील रघुनाथ मंदिर हे भगवान रामाचे प्रसिद्ध मंदिर असून ते खूप सुंदर मंदिर आहे. या मंदिराचे संपूर्ण कोरीव काम हे मुघल शैलीतील आहे व या ठिकाणी तुम्हाला अनेक देवदेवतांचे मंदिर देखील पाहायला मिळतात.

2- काळाराम मंदिर,नाशिक नाशिक मधील काळाराम मंदिर देखील अध्यात्मिक दृष्ट्या खूप प्रसिद्ध व महत्त्वाचे असे मंदिर आहे. काळाराम मंदिरामध्ये भगवान श्रीरामांची दोन फूट उंचीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे व यामुळेच या मंदिराला काळाराम असे नाव पडले आहे. विशेष म्हणजे या मंदिर परिसरामध्ये भगवान श्री रामाने त्यांच्या वनवास कालावधीतील दहा वर्षे घालवली आहेत असं म्हटले जाते.

3- रामराजा मंदिर,मध्य प्रदेश मध्यप्रदेश राज्यातील ओरछा या ठिकाणी हे राम मंदिर आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी श्रीरामाची पूजा एक राजा म्हणून केली जाते व या मंदिराची रचना किल्ल्यासारखी आहे. तसेच या मंदिरात दररोज गार्ड ऑफ ऑनर केला जातो व राजारामला वंदन केले  जाते.

4- सितारामचंद्र स्वामी मंदिर,तेलंगणा तेलंगणा मधील हे मंदिर खूप सुंदर असे मंदिर असून या मंदिरा बाबतीत एक महत्त्वाची आख्यायिका आहे व ती म्हणजे प्रभू श्रीराम यांनी माता सीतेला लंकेतून आणण्याकरिता गोदावरी नदी पार केली होती व ते हेच ठिकाण आहे असे म्हटले जाते. तसेच या ठिकाणी असलेल्या रामाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती त्रिभंग रूपामध्ये आहे.

5- त्रिप्रयार श्रीराम मंदिर,केरळ त्रिप्रयार श्रीराम मंदिर हे केरळ राज्यातील त्रिशूल जिल्ह्यातील खूप प्रसिद्ध असे मंदिर आहे. या ठिकाणाच्या रामाच्या मूर्तीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये रामाची जी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे तिची पूजा स्वतः भगवान श्रीकृष्णाने केली होती अशी यासंबंधीची आख्यायिका आहे.