Ram Mandir In India: भारतामध्ये आहेत ‘ही’ प्रसिद्ध राम मंदिरे! अयोध्यातील राम मंदिरसारखे आहे महत्त्व

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ram Mandir In India:- आज संपूर्ण देशामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष असून संपूर्ण भारतामध्ये आज राममय वातावरण झाल्याचे चित्र आहे. या सगळ्या विधीवत कार्यक्रमाला साधारणपणे 16 जानेवारीपासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे.

त्यामुळे हा एक ऐतिहासिक आणि अध्यात्मिक सोहळा असून  संपूर्ण भारत देश या सोहळ्यासाठी तयार झाला आहे. या राम मंदिराला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्व असून या गोष्टीला खूप मोठा इतिहास देखील आहे. या अयोध्येतील राम मंदिराच्या अनुषंगाने जर आपण भारताचा विचार केला तर  इतर काही राज्यांमध्ये देखील प्रसिद्ध असे राम मंदिर भारतात असून प्रत्येक वर्षाला मोठ्या संख्येने भाविक या राम मंदिरांना भेटी देत असतात.

जर तुम्हाला देखील देशातील या सात ठिकाणी असलेल्या राम मंदिरांना भेट देऊन दर्शन घ्यायचे असेल तर त्यासंबंधीचीच महत्वाची  माहिती या लेखात आम्ही तुम्हाला देत आहोत.

 भारतातील प्रसिद्ध राम मंदिरे

1- मध्यप्रदेश राज्यात आहे राम राजा मंदिर मध्यप्रदेश राज्यामध्ये ओरछा या ठिकाणी हे राम राजा मंदिर असून हे सर्वात पुरातन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराचे जर आपण कोरीव काम पाहिले तर ते वास्तुकलेचे एक अप्रतिम आणि सुंदर उदाहरण असून सोळाव्या शतकात  बुंदेला राजपुतांच्या राजवटीमध्ये हे मंदिर बांधले गेलेले आहे. या राम राजा मंदिराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी भगवान आणि राजा या दोन्हींच्या स्वरूपामध्ये श्रीरामांची पूजा केली जाते व हे भारतातील अशा स्वरूपाचे एकमेव मंदिर आहे.

2- जम्मू काश्मीर राज्यातील रघुनाथ मंदिर जम्मू येथील एका टेकडीवर वसलेले रघुनाथ मंदिर हे प्रभू श्रीरामचंद्रांना समर्पित असे एक प्राचीन मंदिर असून हे एक प्रसिद्ध रामाचे मंदिर आहे. या मंदिराला एक आध्यात्मिक विश्रामाचे केंद्र म्हणून देखील ओळखले जाते व या ठिकाणी भाविकांना अध्यात्मिक आणि शांत अशा वातावरणामध्ये रामाची भक्ती करता येते.

3- वाराणसी( उत्तर प्रदेश) येथील रामनगर किल्ला मंदिर वाराणसी म्हणजेच काशी हे एक भारतातील आध्यात्मिक केंद्र असून या ठिकाणी रामाचे रामनगर किल्ले मंदिर हे खूप प्रसिद्ध असे मंदिर असून बनारसच्या महाराजांनी साधारणपणे 18 व्या शतकामध्ये हे ऐतिहासिक किल्ल्याच्या संकुलात या मंदिराचे बांधकाम केले आहे. या मंदिराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गंगेचे जे काही गर्दीने कायम गजबजलेले घाट आहेत त्यापासून दूर शांत ठिकाणी असे हे मंदिर असून यात्रेकरूंना या ठिकाणचे खूप आकर्षण आहे.

4- अमृतसर( पंजाब) राज्यातील राम तीरथ मंदिर हे मंदिर पंजाब राज्यातील अमृतसर येथे असून भगवान श्रीराम आणि सीतामय्या यांचे पुत्र लव आणि कुश यांच्या जन्माचे संबंधित हे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे प्राचीन विहिरींकरिता प्रसिद्ध असून यामध्ये उपचार शक्ती असल्याचे मानले जाते. जेव्हा लंका जिंकली तेव्हा वाल्मिकी ऋषींनी सीतामय्याला या ठिकाणी आश्रय दिला ते हेच ठिकाण आहे.

5- कानपूर( उत्तर प्रदेश) येथील रामजी मंदिर उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर या शहराच्या मध्यभागी हे रामजी मंदिर असून हे एक जुने मंदिर आहे व कानपूर शहराच्या गर्दी आणि कोलाहाटात आध्यात्मिक शांतता अनुभवायाच्या दृष्टिकोनातून अनेक भाविक या मंदिरात दर्शनाला येतात.

6- तेलंगणा राज्यातील सीता रामचंद्रस्वामी मंदिर हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर असून भद्राचलममधील रामचंद्र स्वामी मंदिर म्हणून ते ओळखले जाते. हे मंदिर साधारणपणे 17 व्या शतकात बांधले गेले असून  या मंदिराच्या परिसरामध्ये रामायण महाकाव्य आणि त्या संबंधित गोष्टींचे अनेक शिल्प कला या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. या ठिकाणाच्या मंदिरातील कोरीव काम अतिशय सुंदर आणि आकर्षक असून अनेक भाविक यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनाला येतात.