Tirupati Balaji Darshan: तिरुपती बालाजीला दर्शनाला जायचे आहे का? तर अगोदर वाचा दर्शनाची वेळ आणि तिकीट खर्च

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tirupati Balaji Darshan:- जेव्हा सुट्टींचा कालावधी असतो किंवा विकेंडमध्ये बरेच जण कुटुंबासमवेत किंवा मित्रांसोबत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा गड किल्ले, हिल स्टेशन इत्यादी ठिकाणी फिरायला जायची योजना बनवतात. यासोबतच बरेच जण काही अध्यात्मिक ठिकाणांना भेट देतात.

जर आपण आध्यात्मिक ठिकाणांचा विचार केला तर  पार भारताच्या उत्तरेत असलेल्या बद्रीनाथ केदारनाथ, काशी तसेच अयोध्या, बारा ज्योतिर्लिंग इत्यादी अध्यात्मिक ठिकाणांना भेट द्यायची योजना अनेक जण बनवत असतात.

त्यातल्या त्यात शिर्डी आणि तिरुपती बालाजी या दोन्ही अध्यात्मिक ठिकाणांचा विचार केला तर या ठिकाणी देव दर्शनाला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड प्रमाणात असते. यापैकी जर आपण श्रीमंत मंदिरांचा विचार केला तर प्रथम क्रमांकावर तिरुपती बालाजी आणि दुसऱ्या क्रमांकावर शिर्डी येथील साई मंदिर यांना ओळखले जाते.

यापैकी जर तुम्हाला तिरुपती बालाजीला दर्शनाला जायचे असेल तर त्या ठिकाणी असलेली दर्शनाची वेळ व लागणारा तिकिटाचा खर्च किती आहे? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 तिरुपती बालाजी दर्शनाला जा परंतु ही आहे दर्शनाची वेळ

तिरुपती बालाजी हे जगप्रसिद्ध मंदिर असून ते भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यात आहे. हे मंदिर अनेक रहस्यांनी भरलेले असून हे भारतातील सर्वात श्रीमंत व प्रसिद्ध अशा मंदिरांपैकी एक आहे. तिरुपती बालाजी येथे भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून मोठ्या प्रमाणावर श्रद्धाळू दर्शनाला येतात.

तिरुपती बालाजी मंदिराचा मुख्य देवता पाहिला तर हे वेंकटेश्वर स्वामी असून ते भगवान विष्णूचा अवतार म्हणले गेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून येते.

आपण तिरुपती बालाजी मंदिर दर्शन वेळ पाहिली तर त्या ठिकाणी असलेल्या ब्रह्मोत्सवासारख्या काही विशिष्ट किंवा विशेष उत्सवाप्रसंगी हे मंदिर भाविकांसाठी वर्षभर खुले असते. साधारणपणे तिरुपती बालाजी मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे असेल तर त्याची वेळ ही सकाळी तीन ते दुपारी एक वाजून 30 मिनिटापर्यंत आहे

व त्यानंतर दुपारी दोन वाजून 30 मिनिटं ते रात्री साडेनऊ पर्यंत दर्शन घेता येते. एवढेच नाही तर हे मंदिर शुक्रवारी आणि शनिवारी 24 तास भाविकांसाठी उघडे असते. परंतु जर मंदिरामध्ये काही विधी असल्या तर मंदिराच्या वेळेत काही बदल होऊ शकतो.

 किती आहे तिकिटाचा दर?

तिरुपती बालाजी मंदिरामध्ये दर्शनाकरिता तिकिटाची किंमत ही तुम्हाला कुठल्या प्रकारानुसार दर्शन घ्यायचे आहे त्यानुसार बदलत असते. साधारणपणे अंदाज घेतला तरी व्हीआयपी दर्शनाकरिता तीनशे रुपये या ठिकाणी लागतात तर सामान्य तिकीट घ्यायचे असेल तर तुम्हाला ते पन्नास रुपयांमध्ये मिळू शकते.