Tourist Place: उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात रेल्वेने प्रवास करून भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या! प्रवासाचा मिळेल सुखद आनंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tourist Place:- सध्या उन्हाळा सुरू झाला असून संपूर्ण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी पार हा 40° च्या आसपास आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही करणारा उकाड्यामुळे सर्वजण त्रस्त आहेत. अशा नकोशा असलेल्या या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये सुट्ट्या देखील असतात व अशा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बरेच जण  कुटुंब व मित्रांसमवेत ट्रीप प्लान करतात.

अशा ट्रिपसाठी जाण्याकरिता स्वतःच्या कारचा वापर केला जातो किंवा एखादी कार भाड्याने घेऊन ठरवलेले ठिकाणी जाता येते. परंतु भारतामध्ये असे काही ठिकाणी आहेत जी ठिकाणे पाहण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही जर रेल्वेचा पर्याय निवडला तर तुमची ट्रिप खऱ्या अर्थाने तुम्हाला आनंद देणारी ठरेल.

तुम्ही अशा ठिकाणे पाहण्यासाठी रेल्वेने प्रवास कराल तर तुम्हाला प्रवासाचा मस्त आनंद घेता येईल व त्या ठिकाणी असलेले निसर्ग सौंदर्य डोळे भरून पाहता येईल. त्यामुळे आपण या लेखांमध्ये भारतातील अशी काही ठिकाणी पाहणार आहोत ज्या ठिकाणी तुम्ही रेल्वेने प्रवास केला तर चांगला आनंद मिळू शकतो.

 या ठिकाणी जाण्यासाठी करा रेल्वेचा वापर

1- पठाणकोट ते हिमाचल प्रदेशातील जोगिंदर नगर तुम्हाला जर हिमाचल प्रदेशला जायचं असेल तर तुम्ही पंजाब मधून हिमाचल प्रदेशला जाण्यासाठी रेल्वेचा वापर करू शकतात.

याकरिता तुम्ही पंजाब मधील पठाणकोट येथून हिमाचल प्रदेश मधील जोगिंदर नगर या ठिकाणी रेल्वेने प्रवास करताना त्या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याचा तुम्हाला सुखद आनंद घेता येईल. तुम्ही या दोन ठिकाणादरम्यान जेव्हा प्रवास कराल तेव्हा तुम्हाला सगळीकडे हिरवळच हिरवळ पाहायला मिळेल.

2- जम्मू ते बारामुल्ला जम्मू-काश्मीरमध्ये देखील तुम्ही रेल्वेने प्रवास केला तर तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणे पाहता येतात व तुमचा प्रवास देखील आनंददायी होतो. तुम्हाला जम्मू या ठिकाणी रेल्वेने प्रवास करायचा असेल व आनंद घ्यायचा असेल तर जम्मू ते बारामुल्ला या मार्गाने तुम्ही प्रवास करणे गरजेचे आहे.

कारण या ठिकाणाचे पर्यटन स्थळे अगदी अविस्मरणीय असून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी थंडगार वातावरणाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी घेता येईल.

3- कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये तुम्ही भारताचे शेवटचे टोक कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम असा प्रवास रेल्वेने करू शकतात. या मार्गावर देखील तुम्हाला प्रवासाचा खूप मनसोक्त असा आनंद घेता येईल.

भारतातील जे काही सुंदर रेल्वे प्रवास आहेत त्यापैकी हा एक प्रवास मानला जातो. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान तुम्हाला रेल्वेने अरबी समुद्र पाहण्याचा आनंद मिळेल.

4- शिमला उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये फिरण्यासाठी शिमला हे एक भारतातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करून आनंद घ्यायचा असेल

तर कालका ते शिमला असा प्रवास तुम्ही रेल्वेने करू शकतात. या मार्गावर तुम्हाला अनेक सुंदर असे नैसर्गिक स्थळे पाहायला मिळतील. हा रेल्वे मार्ग देखील भारतातील सुंदर रेल्वे मार्गांपैकी एक रेल्वे मार्ग आहे.

5- उटी उटी हे थंड हवेचे ठिकाण असून भारतातील बरेच पर्यटक उन्हाळ्यामध्ये उटीला फिरण्यासाठी महत्त्वाचे स्थान देतात. तुम्हाला जर उटीला जाण्यासाठी रेल्वे प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही मेट्टपालयम ते उटी असा प्रवास रेल्वेने करू शकतात. या दोन ठिकाणादरम्यान प्रवास करताना तुम्हाला सगळीकडे हिरवळ आणि गर्द दाट झाडी आणि डोंगरे पाहायला मिळतील.