Pune To Goa Train Time-Table:- भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळे असून या ठिकाणी दरवर्षी अनेक पर्यटक भेटी देत असतात. अशा पर्यटन स्थळांना जाताना प्रामुख्याने स्वतःची कार असेल तर उत्तम राहते. नाहीतर ट्रेन किंवा इतर वाहतुकीच्या साधनांच्या माध्यमातून प्रवास केला जातो व आपल्याला जायच्या त्या पर्यटन स्थळी किंवा इच्छित स्थळी आपण पोहोचत असतो.
जर आपण भारतातील महत्त्वाच्या असलेल्या पर्यटन स्थळांचा विचार केला तर गोवा हे निसर्ग सौंदर्याने समृद्ध व सुंदर असे समुद्रकिनारे तसेच इतर अनेक ऐतिहासिक समृद्ध ठेव्याकरिता प्रसिद्ध असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात व कुठल्याही हंगामामध्ये या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आपल्याला दिसून येते.
गोव्याला जायचे तर तुम्ही ट्रेन किंवा फ्लाईट आणि रस्त्याने देखील जाऊ शकतात. महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी गोव्याला जाण्यासाठी ट्रेनची सुविधा देखील उपलब्ध आहे व तशी ती पुण्यातून देखील उपलब्ध आहे.
त्यामुळे तुम्हाला देखील पुण्यावरून जर गोवा फिरायला जायचे असेल तर त्याकरिता बऱ्याच ट्रेन पुण्यावरून उपलब्ध असून त्या माध्यमातून तुम्ही पुण्याहून गोव्याला जाऊ शकतात. पुणे आणि गोवा हे अंतर 577 किलोमीटर इतके आहे व दररोज पुण्यावरून गोव्याला जाण्यासाठी ट्रेन उपलब्ध आहेत.
पुण्यावरून गोवा जाणाऱ्या ट्रेन आणि त्यांचे वेळापत्रक
1- गोवा एक्सप्रेस(12780)- गोवा एक्सप्रेस ही प्रामुख्याने दिल्लीवरून येते व पुण्याहून गोव्याला जाते. जर पुण्याहून निघण्याचा वेळ बघितला तर ही ट्रेन दुपारी पाच वाजून दहा मिनिटांनी पुण्यावरून निघते आणि पहाटे पाच वाजून 40 मिनिटांनी गोव्याला पोहोचते. साधारणपणे पुण्यावरून गोव्याला पोहोचण्याकरिता या ट्रेनला बारा तास तीस मिनिटांचा कालावधी लागतो.
2- पुणे ERS एक्सप्रेस(22150)- ही ट्रेन पुण्यावरून संध्याकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी प्रस्थान करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता गोव्याला पोहोचते. म्हणजेच एकंदरीत पुण्यावरून गोव्याला पोहोचण्याकरिता या ट्रेनला सुमारे 12 तास आणि पंधरा मिनिटांचा कालावधी लागतो.
3-दादर हुबळी एक्सप्रेस(17318)- ही एक्सप्रेस दादर वरून पुण्याला येते व हुबळी कर्नाटक या ठिकाणी जाते. दादर हून पुण्याला आल्यानंतर ही ट्रेन दररोज रात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी पुण्यावरून सुटते आणि गोव्याला सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते.
4- पूर्णा एक्सप्रेस(11097)- ही ट्रेन पुण्याहून शनिवारी रात्री दहा वाजून 25 मिनिटांनी प्रस्थान करते आणि गोव्याला दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी पोहोचते.
5- ऑल एसबीसी गरीब नवाज(16531)- ही ट्रेन दर मंगळवारी रात्री 1 वाजून 50 मिनिटांनी पुण्यावरून प्रस्थान करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गोव्याला 11 वाजून 3 मिनिटांनी पोहोचते.
पुणे ते गोवा तिकीट दर किती आहेत?
आपण पुणे ते गोवा या प्रवासातील तिकीट दर पाहिले तर ते स्लीपर क्लाससाठी 400 ते 600 रुपये,थर्ड एसीकरिता अकराशे ते चौदाशे रुपये, सेकंड एसीकरिता 1600 ते 2100 रुपये आणि फर्स्ट एसीकरिता 2500 ते 3200 रुपये अशा पद्धतीचे तिकीट दर आहेत.
या ट्रेनविषयी किंवा तिकीट दरांविषयी अधिकची माहिती तुम्ही आयआरसीटीसी किंवा रेल्वेच्या अधिकृत बुकिंग पोर्टलला भेट देऊन जाणून घेऊ शकतात.