कशामुळे झाले लता मंगेशकर यांचं निधन ? समोर आली ही माहिती…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lata mangeshkar latest news ;- भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital)आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या 30 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. शनिवारी लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. त्याआधी लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि प्रख्यात गायिका आशा भोसले, बंधू आणि सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी शनिवारी रात्री भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि श्रद्धा कपूर, पियुष गोयल यांनीही रुग्णालयात भेट दिली होती.

अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन !

रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकर यांचे निधन झाले, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयतील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली. कोव्हिडची लागण झाल्यापासून 28 दिवसांहून अधिक कालावधीनंतर अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.