समुद्रकिनारा पाहण्यासाठी कशाला हवे गोवा? भारतातील हे ठिकाण सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आहे प्रसिद्ध आणि पाहता येते बरेच काही…..

गोव्यासाठी गोकर्ण हा एक उत्तम पर्याय आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गोकर्ण हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये येते व गोवा कर्नाटक सीमेवर आहे. तुम्हाला जर गोव्यावरून जायचे असेल तर गोवा ते गोकर्ण १४० किलोमीटर इतके अंतर असून दरम्यान तुम्हाला अनेक सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनारे पाहता येतात.

Ajay Patil
Published:
beach in goa

Tourist Places In Gokarna:- जेव्हा कुणाला समुद्रकिनारा पाहण्याची इच्छा होते तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे गोवा व त्या ठिकाणी असलेले सुंदर समुद्रकिनारे म्हणजेच बीचेस होय. गोवा हे पार्टी आणि पर्यटनासाठीचे एक प्रसिद्ध असे राज्य असून बहुतेक लोकांना गोवा जाण्याची इच्छा असते व दरवर्षी लाखोंच्या संख्येने देश-विदेशातून या ठिकाणी पर्यटक भेट देत असतात.

परंतु या ठिकाणी असणारा प्रचंड गोंगाटामुळे आणि पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे ज्या लोकांना निवांत आणि शांततेमध्ये समुद्रकिनारा पाहायचा असतो व निवांत वेळ घालवायचा असतो त्यांना गोवा तितकासा आवडत नाही. त्यामुळे अशा पर्यटकांसाठी गोव्यापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असणारे एक ठिकाण म्हणजे गोकर्ण होय.

या ठिकाणी तुम्हाला अनेक शांत आणि सुंदर समुद्रकिनारे पाहता येतात. गोव्यासाठी गोकर्ण हा एक उत्तम पर्याय आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गोकर्ण हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये येते व गोवा कर्नाटक सीमेवर आहे. तुम्हाला जर गोव्यावरून जायचे असेल तर गोवा ते गोकर्ण १४० किलोमीटर इतके अंतर असून दरम्यान तुम्हाला अनेक सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनारे पाहता येतात.

गोकर्णला कसे जाता येईल?

1- हवाई मार्गे- हवाई मार्गे जायचे असेल तर गोकर्णला सर्वात जवळचे विमानतळ गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. गोवा ते गोकर्ण साधारणपणे 106 किलोमीटर असून गोव्यापासून गोकर्ण पर्यंत बस आणि टॅक्सी देखील सहजपणे उपलब्ध आहेत.

2- रेल्वे मार्गाने- गोकर्णला काशी देखील म्हटले जाते. या ठिकाणी रेल्वे स्टेशन असून गोकर्ण हे देशातील प्रमुख स्थानकांशी जोडलेले नाही. गोकर्ण पासून 20 किलोमीटर वर अंकोला रेल्वे स्टेशन असून या ठिकाणी तुम्हाला सहजपणे ट्रेन उपलब्ध होऊ शकते.

3- रस्ते मार्गाने- गोकर्ण रोडला जोडलेले असून गोव्याहून गोकर्णला जाण्यासाठी तुम्हाला बस मिळतात. बेंगलोर व मंगलोर या ठिकाणहून देखील तुम्हाला बसेस उपलब्ध असतात.

गोकर्णला गेल्यावर काय पहाल?
हे एक मंदिरांचे शहर असून या ठिकाणी भेट दिल्यावर पाहण्यासारखे भरपूर काही आहे. या ठिकाणी शांत आणि सुंदर असे समुद्रकिनारी आहेत व याशिवाय अनेक प्राचीन मंदिरे देखील आहेत. निसर्गरम्य अशी धबधबे देखील या ठिकाणी असून जवळपास असलेली अनेक ठिकाणे तुम्ही पाहू शकतात.

गोकर्ण येथील प्रसिद्ध सी बीच
1- गोकर्ण बीच- गोकर्णाच्या या बीचचे नाव ओम बीच गोकर्ण असे आहे. या बीचचा आकार ओम सारखा आहे. हे बीज वॉटर स्पोर्टसाठी प्रसिद्ध असून निसर्ग सौंदर्यात वेळ घालवण्यासाठी हे बीच उत्तम ठिकाण आहे.

2- हाफ मून बीच- गोकर्णचा हा बीच फार मोठा नाही. हाफ मून बीच ट्रॅव्हल बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या ठिकाणी पर्यटकांची फारशी गर्दी होत नाही. या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी टेकड्यांमधून चालत जावे लागते.

3- कुडले बीच- कुडले बीच हे गोकर्णच्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी होणारा सूर्यास्त पाहण्याची मजा काही औरच असते. याशिवाय गोकर्ण मध्ये पॅराडाईज बीच देखील आहे. त्यामुळे गोकर्णाला जर तुम्हाला बीच पाहायचे असतील तर पॅराडाईज बीच नक्की पहावे.

गोकर्णला पाहता येतील ही प्रसिद्ध मंदिरे

 

1- महाबळेश्वर मंदिर- गोकर्ण येथे अनेक मंदिर आहेत व यापैकी महाबळेश्वर मंदिर गोकर्ण हे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामध्ये सहा फूट उंचाची शिवलिंग आहे व हे आत्मलिंग म्हणून ओळखले जाते. या मंदिराशी रावणाची कथा जोडलेली आहे.

2- भद्रकाली मंदिर- गोकर्णाचे हे मंदिर देखील खूप जुने असून या ठिकाणी भगवान शिव तसेच विष्णू आणि ब्रह्मदेवांनी वेत्रासुराचा पराभव करण्यासाठी भद्रकाली निर्माण केली होती असे म्हटले जाते.

3- श्री सोमेश्वर मंदिर- श्री सोमेश्वर मंदिर गोकर्णचाही प्राचीन गोकर्ण मंदिरांमध्ये समावेश होतो. हे 14 व्या शतकात चोलांनी बांधले होते. या मंदिराची वास्तू अतिशय भव्य आहे व याशिवाय तुम्ही गोकर्णातील महालसा मंदिर आणि महागणपती मंदिरालाही भेट देऊ शकतात.

गोकर्ण येथील मिरजन किल्ला आहे पाहण्यासारखा
गोव्याप्रमाणेच गोकर्ण येथे देखील एक किल्ला असून या किल्ल्याचे नाव मिरजन किल्ला असे आहे. गोकर्ण पासून 11 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.

हिरवाईने नटलेला हा किल्ला पाहण्यासारखा आहे. हा किल्ला 14 व्या शतकात नवैथ सल्तनतने बांधला होता व पुढे हा किल्ला विजयनगरच्या ताब्यात गेला.
या पद्धतीने गोव्यापेक्षा गोकर्णला गेला तर तुम्हाला पर्यटनाचा मनमुराद आनंद घेता येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe