file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय कामकाज करताना मोबाईल फोनचा वापर करण्याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन वापराबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मोबाईलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा.

तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी, यासह 9 महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारतर्फे हे परिपत्रक काढण्यात आले आहे. कार्यालयीन वेळात मोबाइल फोनचा अंदाधुंद वापर केल्याने सरकारची प्रतिमा धुळीस मिळते,

असे या आदेशात म्हटले आहे. जर मोबाइल फोन वापरायचे असतील तर टेक्स्ट मेसेजचा अधिक वापर करावा या उपकरणांद्वारे केलेली संभाषणे कमी केली जावीत. कार्यालयीन वेळेत मोबाईलद्वारे सोशल मीडियाचा वापर मर्यादित असावा, असे सरकारने म्हटले आहे.

या आचारसंहितेत असे म्हटले आहे की मोबाईल फोनवरील वैयक्तिक कॉलचे उत्तर ऑफिसबाहेर दिले पाहिजे.

आसपास लोकं आहेत हे लक्षात ठेवून मोबाइल फोनवर विनम्रपणे आणि कमी आवाजात बोलणे आवश्यक असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. तर, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फोन कॉलना जराही उशीर न करता उत्तर द्यायला हवे असे यात म्हटले आहे.

  • कार्यालयीन कामासाठी कार्यालयात असलेला दूरध्वनीचा (लँडलाईन) वापर करावा
  • मोबाईल वरती बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा आणि आपल्या बाजूला इतरही उपस्थित आहे याचाही विचार करावा
  • मोबाईल वरती बोलताना संविधानिक भाषेचा वापर करावा
  • मोबाईल वरती बोलत असताना लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉल्सला तात्काळ उत्तर द्यावा
  • अत्यावश्यक वैयक्तिक मोबाईल कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाईल सायलंट मोड वरती ठेवण्यात यावा
  • कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावरती असाल तर मोबाईल बंद ठेवू नये
  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
  • फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम