अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी किस करणं हे उत्तम एक्सप्रेशन समजलं जातं. सामान्यपणे किस सगळेच करतात कुणी गालावर तर कुणी ओठांवर.

पण किसचे वेगवेगळे प्रकारची असतात हे फार कुणाला माहीत नसतं. कधी कधी सिनेमांच्या मार्फत अनेकदा किसचे वेगवेगळे प्रकार समोर येतात. पण त्याबाबत पुरेशी माहीत नसते. त्याचप्रमाणे किस घेण्याचे अनेक फायदे देखील आहेत. चला जाणून घेऊयात –

सेक्स करण्याला प्रोत्साहन मिळतं :- किस केल्यामुळे सेक्ससाठी प्रवृत्त करणारे सर्व हार्मोन्स मोकळे होतात. त्यामुळे सेक्स करण्यासाठी किस हे सर्वात महत्त्वाचं आहे.

जोडीदाराशी संवाद साधायला मदत करते :- बऱ्याचदा कोणत्याही शब्दांपेक्षा स्पर्श जास्त चांगलं काम करत असतो. त्यामुळे किस घेतल्यास त्यामधून नक्की आपल्याला काय भावना व्यक्त करायच्या आहेत हे स्पष्ट होतं. तुमच्या जोडीदाराकडे भावना व्यक्त करायच्या आहेत का? नक्की किस करा. भांडण झाल्यानंतर गोष्टी नीट सावरायच्या आहेत? किस करा. माफी मागायची आहे? किस करा. वास्तविक किस केल्याने सर्वच भांडणं लगेच मिटून जातात. कारण त्यात शब्दांची वाढ होत नाही आणि प्रेमाची देवाणघेवाण होते.

तुमच्या हार्मोन्सना आनंद मिळवून देते :- ऑक्सीटॉसिन, डोपामाईन, सेरोटिन यासारख्या सर्व हार्मोन्सना किस आनंद मिळवून देते. त्यामुळे नेहमी किस घेतल्यानंतर तुम्हाला खूप बरं वाटतं आणि आनंदी वाटतं.

तणावमुक्त करते :- माणसाच्या शरीरामध्ये तणावाचं कॉर्टिसोल नावाचं हार्मोन असतं. तुमच्या शरीरातील सर्व चांगल्या आणि वाईट भावना या खरंतर याचं हार्मोनवर अवलंबून असतात. पण जेव्हा तुम्ही किस करता, तेव्हा तुमचे आनंदी हार्मोन्स असतात ते कॉर्टिसोल हार्मोन्सची पातळी कमी करायला मदत करतात. त्यामुळे तुमचा तणाव आपोआप कमी होतो. जेव्हा जेव्हा तुम्ही मिठी मारता किंवा किस करता त्या प्रत्येक वेळी तुमचा तणाव कमी होतो. आताच्या ताणतणावात तणावमुक्त राहण्यासाठी नक्कीच हा उपाय चांगला आहे, नाही का?

चेहऱ्यावरील स्नायूचा ताण कमी होतो :- तुम्हाला जर अधिक चांगली जॉलाईन आणि अधिक चांगली आपल्या गालांची हाडं व्हायला हवी असतील तर तुमच्या जोडीदाराला किस करा. किस केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील २ ते ३४ स्नायू मोकळे होत असतात. तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंसाठी हा योग्य आणि सोपा व्यायाम आहे.

कॅलरीज जाळते :- तुमच्या जोडीदाराला किस करण्यासाठी अधिक कारणांची गरज आहे का? तर कॅलरी जाळण्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही जितक्या वेगाने किस कराल तितक्या वेगाने तुमच्या चेहऱ्याचे स्नायू मोकळे होऊन साधारण २ ते २६ कॅलरी एका वेळी बर्न होतात. हे नक्कीच इंटरेस्टिंग आहे ना?

चेहऱ्यावरील त्वचा नितळ ठेवते :- किस करताना चेहऱ्यावरील काही पेशी ओढल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या कमी पडतात आणि त्वचा नितळ राहते

दात चमकदार राहतात :- किस करताना जी लाळ तयार होते ती दात किडण्यापासून दातांचे संरक्षण करते. दातांवरील अन्नाचे कण आणि काही जंतुंचा नायनाट करण्यास मदत होते. यामुळे दात किडत नाहीत आणि ते लाळेमुळे धुतले गेल्याने चमकदार राहतात.