Ahmednagar ZP Bharti – कोरोना कालावधीनंतर राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विभागांतर्गत असलेल्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियांना स्थगिती देण्यात आलेली होती. परंतु आता मागील काही महिन्यांचा विचार केला तर राज्य शासनाच्या अनेक विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या गेलेल्या आहेत व आता परत काही जिल्हा परिषद किंवा इतर विभागांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत.
यावर्षी तलाठी, वनरक्षक तसेच विविध जिल्हा परिषदांतर्गत असलेल्या विभागांच्या माध्यमातून रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेले आहेत व येणाऱ्या दिवसात आणखी भरती प्रक्रिया राबवल्या जाण्याची शक्यता आहे.
या अनुषंगाने जर आपण राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेचा विचार केला तर अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत अहमदनगर जिल्हा आयुष्य रुग्णालय याकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यामध्ये विविध 28 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याबाबत अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अधिकृत अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आयुष अभियान आणि अहमदनगर जिल्हा परिषद भरतीमधील रिक्त पदे आणि संख्या
राष्ट्रीय आयुष अभियान आणि अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे व त्यामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी 01, वैद्यकीय अधिकारी 6 जागा, सहाय्यक मेट्रॉन 1 जागा, लेखाधिकारी( आयुष्य ) 1 जागा, योग प्रशिक्षक 01जागा,
स्टाफ नर्स( महिला) 04 जागा, स्टाफ नर्स( पुरुष) 04 जागा, फार्मासिस्ट 3 जागा, नोंदणी लिपिक 1 जागा, स्टोअर कीपर 2 जागा, लॅब टेक्निशियन 2 जागा, पंचकर्म तंत्रज्ञ( महिला) 1 जागा आणि पंचकर्म तंत्रज्ञ ( पुरुष) 1 जागा
अशा एकूण 28 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
काय लागेल शैक्षणिक पात्रता?
या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार असून याकरता अधिकची माहिती हवी असेल तर अधिसूचना पाहणे गरजेचे आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना पदनिहाय मिळणारे वेतन
1- निवासी वैद्यकीय अधिकारी- मासिक वेतन तीस हजार
2- वैद्यकीय अधिकारी- मासिक वेतन 28 ते 30 हजार
3- सहाय्यक मेट्रोन- मासिक वेतन 25000
4- लेखाधिकारी( आयुष)- मासिक वेतन 20000
5- योग प्रशिक्षक- मासिक वेतन 17000
6- स्टाफ नर्स (महिला)- मासिक वेतन 20000
7- स्टाफ नर्स (पुरुष)- मासिक वेतन 20000
8- फार्मासिस्ट- मासिक वेतन 18000
9- नोंदणी लिपिक- मासिक वेतन 18000
10- स्टोअर कीपर- मासिक वेतन अठरा हजार
11- लॅब टेक्निशियन- मासिक वेतन 17000
12- पंचकर्म तंत्रज्ञ (महिला)- मासिक वेतन 17000
13- पंचकर्म तंत्रज्ञ (पुरुष)- मासिक वेतन 17000
नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
या भरती प्रक्रिया अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना अहमदनगर या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
राबवण्यात येत असलेल्या या भरती प्रक्रिये करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून त्याची शेवटची तारीख ही 17 नोव्हेंबर असणार आहे.
या पत्त्यावर पाठवावेत अर्ज
या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करायचे असून राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अहमदनगर या पत्त्यावर अर्ज पाठवणे गरजेचे आहे.