समाज कल्याण विभागामध्ये निघाली बंपर भरती! पटकन करा अर्ज आणि करा संधीचे सोने; जाणून घ्या ए टू झेड माहिती

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक कल्याण विभाग, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती करण्याच्या अनुषंगाने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून ही भरती 219 रिक्त जागांसाठी घेण्यात येत आहे व याकरिता जर तुम्ही पात्र असाल तर 10 ऑक्टोबर पासून अर्ज करू शकणार आहात.

Ajay Patil
Published:
samajkalyan vibhag bharti

तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असाल आणि त्यासाठीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी असून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक कल्याण विभाग, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती करण्याच्या अनुषंगाने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून ही भरती 219 रिक्त जागांसाठी घेण्यात येत आहे

व याकरिता जर तुम्ही पात्र असाल तर 10 ऑक्टोबर पासून अर्ज करू शकणार आहात. ही भरती प्रक्रिया प्रामुख्याने वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल( महिला), गृहपाल( सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक,लघु टंकलेखक या रिक्त पदांसाठी राबविण्यात येत आहे.

 या भरतीसाठी पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता

1- गृहपाल/ अधीक्षक( सर्वसाधारण), गृहपाल/ अधीक्षक( महिला) पदासाठी उमेदवाराने कुठल्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या माध्यमातून कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे.

याशिवाय महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अर्थात एमकेसीएलची एमएसआयटी ही संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

2- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी उमेदवार हा कुठल्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कुठल्याही शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे किंवा शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असेल तर प्राधान्य मिळेल व त्यासोबतच एमएससीआयटी संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3- समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी या पदासाठी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे व त्यासोबतच एमएससीआयटी ही संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

4- उच्च श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी शासनमान्य माध्यमिक शालांत परीक्षा बोर्ड अर्थात दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच टायपिंग म्हणजे टंकलेखन( इंग्रजी) 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे. त्यासोबतच एमएससीआयटी संगणक परीक्षा पास असणे गरजेचे आहे.

5- निम्नश्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक( इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी टायपिंग म्हणजेच लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण गरजेचे आहे किंवा उच्चश्रेणी लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे 100 शब्द प्रतिमिनिट लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असावी.

6- लघु टंकलेखक या पदासाठी शासनमान्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लघुलेखनाचा म्हणजेच टायपिंगचा स्पीड किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंगचा स्पीड किमान 40 शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टायपिंगचा स्पीड कमीत कमी 30 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे.

 या भरती विषयी इतर महत्त्वाची माहिती

ही भरती प्रक्रिया 219 रिक्त जागांसाठी राबविण्यात येत असून त्यामध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांचे नोकरीचे ठिकाण पुणे असेल. तसेच ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात व अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 ही आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe