Career Tips:- इंजीनियरिंग म्हणजेच अभियांत्रिकी क्षेत्र बघितले तर यामध्ये खूप मोठा स्कोप असून अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या ब्रांचेस म्हणजे शाखा देखील आहे. यामधील जर आपण केमिकल इंजिनिअरिंगचा विचार केला तर केमिकलच्या संबंधित असलेले हे क्षेत्र खूप मोठे असल्यामुळे केमिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा पदवी घेतल्यानंतर खूप मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
केमिकल क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की जे कच्च्या मालास उपयुक्त अशा उत्पादनामध्ये रूपांतरित करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. तसेच केमिकल इंजीनियरिंगच्या माध्यमातून केमिकल प्लांटचे डिझाईन तसेच त्यांचे देखभाल, बांधकाम व कार्यपद्धती इत्यादी कामे देखील इंजीनियरिंगशी संबंधित आहे.
केमिकल इंजिनियरचे काम हे खूप मोठ्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचे असल्याकारणाने केमिकल इंजिनियर्सला युनिव्हर्सल इंजिनिअर असे देखील म्हणतात. त्यामुळे केमिकल इंजिनिअरिंग मध्ये इंजीनियरिंग कम्प्लीट करून तुम्ही तुमचे करिअर चांगल्या पद्धतीने सुस्थापित करू शकतात.
द्यावी लागते प्रवेश परीक्षा
कुठल्याही प्रकारची इंजीनियरिंग इन्स्टिट्यूशन म्हणजेच अभियांत्रिकी संस्था त्यांच्या त्यांच्या पातळीवर प्रवेश परीक्षा घेत असतात. याशिवाय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून देशातील सर्वात महत्त्वाच्या अशा इंजिनिअरिंग संस्थेमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.
केमिकल इंजिनिअरिंगमध्ये आहेत डिप्लोमा कोर्सेस?
दहावी किंवा बारावीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा इन केमिकल इंजीनियरिंग देखील करता येऊ शकते व हा तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्सेस असून हा पूर्ण केल्यानंतर देखील करिअरच्या दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा होऊ शकतो व चांगल्या पगाराची नोकरी लगेच मिळू शकते.
करता येते बीटेक
सायन्स मधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना केमिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेऊन बी.टेक पूर्ण करता येते व बीटेकचा अभ्यासक्रम हा चार वर्षाचा असतो.
पदव्युत्तर अभ्यासक्रम
इतकेच नाही तर बी.टेक पूर्ण केल्यानंतर तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून एम.टेक करू शकता व हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे.
करता येतो पीएचडी कोर्स
विशेष म्हणजे तुम्हाला डॉक्टरेट डिग्री घ्यायची असेल तर केमिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला पीएचडी करता येऊ शकते व केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी करायचे असेल तर तुमच्याकडे एमटेक असणे गरजेचे आहे म्हणजेच पदयुत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
देशातील टॉप 10 इन्स्टिट्यूट
1- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास
2- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई
3- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूर
4- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली
5- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर
6- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रूडकी
7- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी
8- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद
9- अन्ना युनिव्हर्सिटी चेन्नई
10- जादवपुर यूनिवर्सिटी कोलकत्ता
केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधी
देशामध्ये अनेक रासायनिक उद्योग असून याव्यतिरिक्त अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्थापना देखील केली जात आहे. त्यामुळे केमिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांकडे त्याच्या दृष्टिकोनातून खूपच पर्याय उपलब्ध आहेत.
नोकरीचे असलेले चांगले पर्याय आणि केमिकल अभियांत्रिकी म्हणजेच केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या पगारामुळे विद्यार्थी या क्षेत्राकडे अधिक आकर्षित होतात.
अगदी केमिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून म्हणजेच फ्रेशर्स म्हणून तुम्ही नोकरी मिळवली तरी तुम्हाला सहजपणे वीस ते पंचवीस हजार रुपये पगाराची नोकरी मिळते.
जसा जसा तुम्हाला या क्षेत्राचा अनुभव वाढत जातो तशी तशी वेगाने पगारात वाढ होत जाते. केमिकल इंजिनिअरिंग करून तुम्ही तेल आणि वायू उद्योग, अन्न उद्योग तसेच ऊर्जा उद्योग, केमिकल आणि त्यासंबंधीची उत्पादने, फार्मासुटिकल कंपन्या तसेच सरकारी विभागांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करू शकतात.