Career Tips:- सध्या जर आपण शिक्षणाचे स्वरूप पाहिले तर सध्या असलेली गरज आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस होत असलेली प्रगती या अनुरूप शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. अगोदरपासून इंजिनिअरिंग तसेच मेडिकल या शाखांपेक्षा जर तुम्ही कौशल्य आधारित किंवा कोणत्या क्षेत्राला आता जास्त मागणी आहे त्यानुसार शिक्षण घेतले तर ते करिअरच्या दृष्टिकोनातून खूप फायद्याचे ठरू शकते.
याच मुद्द्याला धरून जर आपण टुरिझम अर्थात पर्यटन क्षेत्राचा विचार केला तर सध्या पर्यटनाला खूप मोठी चालना मिळताना दिसून येत असून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर वाव असल्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून जर तुम्ही शिक्षण घेतले तर नक्कीच तुम्ही या माध्यमातून स्वतःसाठी एक करिअरचा चांगला पर्याय उपलब्ध करू शकतात.
बारावी नंतर तुम्ही यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करून करिअर करू शकता. या दृष्टिकोनातून बारावी नंतर कुठल्या प्रकारचे शिक्षण घेतले तर पर्यटनामध्ये करिअर करता येते?यासंबंधीची माहिती घेऊ.
बारावीनंतर पर्यटन क्षेत्रातील शिक्षण
पर्यटन क्षेत्रामध्ये नोकरीच्या अनेक मोठ्या संधी असून त्यामध्ये मधून तुम्ही विदेशात देखील नोकरी किंवा करिअर करू शकतात. पर्यटन क्षेत्रामध्ये नोकरीच्या चांगल्या संधी मिळवण्यासाठी सुरुवातीला बारावीपर्यंत शिक्षण घेणे गरजेचे असते व त्यानंतर तुम्ही पदवीपर्यंत किंवा डिप्लोमा करून या क्षेत्रात नोकरीचा पर्याय निवडू शकतात.
यामध्ये तुम्ही बॅचलर्स ही पदवी मिळवू शकतात किंवा पर्यटन आणि प्रशासनामध्ये बीबीए करू शकतात. एवढेच नाही तर तुम्हाला यामध्ये पदव्युत्तर म्हणजेच मास्टरचे शिक्षण देखील घेता येऊ शकते. एवढेच नाही तर तुम्ही यामध्ये डिप्लोमा कोर्स देखील करू शकतात.
पर्यटन क्षेत्राशी संबंधित शिक्षण तुम्ही कुठल्या संस्थेत घेऊ शकता?
1- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम इन ट्रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वाल्हेर
2- आयआयटीएम, नेल्लोर
3- ईआयटीएम, भुवनेश्वर
4- ख्रिस्त विद्यापीठ, बेंगलोर
5- जामिया. नवी दिल्ली
या संस्थेमध्ये शिक्षण घेऊन तुम्ही पर्यटन क्षेत्रामध्ये करिअर करू शकतात.
पर्यटन क्षेत्रातील नोकरी आणि मिळणारा पगार
पर्यटन क्षेत्रामध्ये शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही टूर मॅनेजर, ट्रॅव्हल गाईड, ट्रॅव्हल एजंट, ट्रॅव्हल्स स्पेशलिस्ट, टुरिझम मॅनेजर आणि ट्रॅव्हल कन्सल्टंट या पदांवर नोकरी मिळवू शकतात व एवढेच नाही तर एखाद्या पर्यटन कंपनीसोबत देखील तुम्ही काम करू शकतात.
पर्यटनामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नोकरीला सुरुवात केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते व वार्षिक पॅकेज पाहिले तर ते पाच ते सात लाखांपर्यंत मिळू शकते. म्हणजेच यानुसार तुम्हाला महिन्याला साधारणपणे 45 ते 60 हजार रुपये पगार मिळू शकतो.