EPFO Bharti 2023: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत नोकरीची संधी! वाचा भरतीची संपूर्ण माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EPFO Bharti 2023:- सध्या विविध विभागांतर्गत राज्य तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून अनेक दिवसांपासून थांबलेल्या भरती प्रक्रियांना सध्या वेग आलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता हा सुवर्णसंधीचा काळ आहे असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून देखील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून याकरिता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आरोग्य विभाग तसेच ग्रामसेवक इतर पदांकरिता भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याच पद्धतीने केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील भरती प्रक्रिया राबविण्यात येणारा असून त्यातीलच म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ अंतर्गत देखील काही रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याच महत्त्वाच्या अशा भरती विषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

 कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेत 42 रिक्त पदांसाठी भरती

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ च्या माध्यमातून सहसंचालक तसेच उपसंचालक व सहाय्यक संचालक या पदांच्या 42 रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असतील अशा उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत अर्ज पाठवणे गरजेचे आहे.

 रिक्त पदांची नावे

ईपीएफ अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून ही सहसंचालक, उपसंचालक तसेच सहाय्यक संचालक या पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबवली जाणारा असून एकूण रिक्त पदे बेचाळीस आहेत.

 या भरती प्रक्रियेकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक अर्जदारांकरिता शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर ते कम्प्युटर एप्लीकेशनमध्ये मास्टर डिग्री किंवा मास्टर ऑफ सायन्स किंवा बॅचलर ऑफ इंजीनियरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील पदवी धारण करणे गरजेचे आहे. त्यासोबतच इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग मधील कमीत कमी एक वर्षाचा अनुभव प्रत्यक्ष प्रोग्रामिंग मधील असणे गरजेचे आहे.

 वेतन किती मिळेल?

1-सहसंचालक( जॉईंट डायरेक्टर) या पदाच्या एकूण सहा जागा रिक्त असून या पदाकरिता वेतन श्रेणी ही 78,800 ते 2 लाख 9 हजार दोनशे रुपये इतकी राहील.

2- उपसंचालक( डेप्युटी डायरेक्टर) या पदाच्या एकूण 12 जागा रिक्त असून या पदाकरिता वेतनश्रेणी 67 हजार 700 ते दोन लाख 8 हजार 700 रुपये इतकी असेल.

3- सहाय्यक संचालक( असिस्टंट डायरेक्टर) या पदाच्या 24 जागा रिक्त असून या पदाकरिता वेतनश्रेणी ही 56 हजार शंभर ते एक लाख 77 हजार पाचशे रुपयांपर्यंत असेल.

 नोकरीचे ठिकाण

या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना ईपीएफओ हेडकॉटर दिल्ली या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल.