Top MBA Colleges In India:- शिक्षण घेत असताना आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचा डिप्लोमा असो किंवा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा इतर क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर ऍडमिशन घेताना ते नामांकित अशा शिक्षण संस्थेमध्ये घेणे गरजेचे असते. कारण अशाप्रकारे जर तुम्ही चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये ऍडमिशन घेतलेले असेल तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला भविष्यातील नोकरी मिळवण्यासाठी त्याची खूप मोठी मदत होत असते.
यामध्ये डोनेशन किंवा इतर गोष्टी महागड्या असतात.परंतु भविष्याच्या दृष्टिकोनातून अशा नामांकित संस्थेमध्ये शिक्षण घेणे फायद्याचे ठरते. बरेच विद्यार्थी हे चांगले नोकरीचे पॅकेज किंवा करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक शाखांमध्ये उच्च शिक्षण घेत असतात. या उच्च शिक्षणामध्ये जर भारताचा विचार केला तर एमबीए करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
ज्या विद्यार्थ्यांना एमबीए करायचे असते असे विद्यार्थी देशातील नामांकित शिक्षण संस्थेमध्ये ऍडमिशन मिळावे याकरिता प्रयत्नशील असतात. त्यामुळे असे एमबीए करण्याचा प्लॅनिंग असलेले विद्यार्थी चांगल्या कॉलेजच्या शोधात असतात.
त्यामुळे आपण या लेखामध्ये अशा काही एमबीए करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतील अशा नामांकित शिक्षण संस्थांची माहिती घेणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे एमबीए पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लाखो रुपयाचे पॅकेज असलेली नोकरी मिळू शकते.
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कने केली आहे देशातील टॉप कॉलेजेसची यादी जाहीर
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कने देशातील काही टॉप आणि नामांकित कॉलेजची यादी जाहीर केली असून यामध्ये जर तुम्ही एमबीए पूर्ण केले व अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच चांगले पॅकेज मिळू शकते. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कने जाहीर केलेले देशातील टॉप शैक्षणिक संस्थांची यादी पुढीलप्रमाणे…
1- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बेंगलोर
2- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद
3- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड
4- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता
5- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनऊ
6- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली
7- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदोर
8- राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई
9- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई
10- एक्सएलआरआय- झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, जमशेदपूर
या दहा टॉप शैक्षणिक संस्था आहेत.
या संस्थांमध्ये कसा मिळेल प्रवेश?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला एमबीएला ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्याकडे पदवी असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे जर पदवी असेल तर देशभरातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या, CAT, MAT, GMAT, XAT आणि CMAT परीक्षांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरिता उमेदवारांना सदर परीक्षांमध्ये चांगला परफॉर्मन्स करून रँक मिळवणे आवश्यक आहे व त्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळणे शक्य होते.