IPPB Recruitment: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 25 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी होणार भरती

Ajay Patil
Published:
job in ippb

IPPB Recruitment:- सध्या विविध विभागांतर्गत नोकरीच्या नोटिफिकेशन जारी करण्यात येत असल्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या व विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना अनेक सुवर्णसंधी चालून येत आहेत. यामध्ये रेल्वे पासून तर बँकिंग क्षेत्रापर्यंत तर राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत देखील भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत.

अगदी याच पद्धतीने जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत अशांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड अर्थात आयपीपीबीच्या माध्यमातून भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली असून या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

 इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये पन्नासहुन अधिक पदांसाठी भरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडच्या माध्यमातून भरती अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्या माध्यमातून 50 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला

असून इच्छुक व पात्र उमेदवार  https://www.ippbonline.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकणार आहेत. सध्या या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून जे उमेदवार पात्र व इच्छुक आहेत ते 24 मे पर्यंत याकरिता अर्ज करू शकणार आहेत.

 या पदांसाठी घेण्यात येत आहे भरती

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 54 जागा भरण्यात येणार आहेत व या 54 जागांमध्ये कार्यकारी(सहयोगी सल्लागार) या पदाच्या 28, कार्यकारी( सल्लागार) या पदाच्या 21 तर कार्यकारी( वरिष्ठ सल्लागार) या पदाच्या पाच जागा रिक्त असून त्याकरिता ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

 या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टिकोनातून बघितले तर उमेदवाराने संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीई किंवा बीटेक पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे

व त्याशिवाय मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन( एमसीए)उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तसेच संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बीसीए/ बीएससी पूर्ण केलेले उमेदवार देखील या भरती करिता अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत.

 पदनिहाय आवश्यक वयोमर्यादा

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी कार्यकारी( सहयोग सल्लागार) या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा 22 ते 30 वर्ष, कार्यकारी( सल्लागार) या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा 22 ते 40 वर्ष आणि कार्यकारी( वरिष्ठ सल्लागार) या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा 22 ते 45 वर्षे इतके आवश्यक आहे.

 निवड झालेल्या उमेदवारांना किती वेतन मिळेल?

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून उपरोक्त पदांसाठी जे उमेदवार निवडले जातील त्यांना वार्षिक पॅकेज हे दहा लाख ते 25 लाख रुपये दरम्यान असणार आहे.

 प्रवर्गनिहाय अर्जासाठी किती शुल्क लागेल?

या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क लागणार असून याकरिता एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे व इतर प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये शुल्क लागणार आहे.

 या पदांसाठीची निवड कशी करण्यात येईल?

या पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार असून यासाठीच्या अधिक माहिती उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe