BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना मिळणार नोकरी, फक्त करा ‘हे’ काम !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2024 : लो.टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढी या विभागा अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी खूपच उत्तम आहे, या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून, कुठे अर्ज पाठवायचे आहेत पाहुयात…

लो.टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढी या विभागा अंतर्गत “रक्त संक्रमण अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन सादर करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.

वरील भरतीसाठी उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार मेडिसीन, एम. डी. (पॅथलॉजी)/ (ट्रान्सफ्युजन मेडिसीन) मध्ये पदव्युत्तर पदवीधारक असावा.

ऑफलाईन अर्ज लो.टि.म.स. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे, भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज सादर करताना लक्षात घ्या अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती असणे अनिवार्य आहे, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.