IB Recruitment 2024: पदवीधरांना इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 1 लाखापेक्षा जास्त पगार मिळवण्याची सुवर्णसंधी! ताबडतोब करा अर्ज

Ajay Patil
Published:
recruitment in ib

IB Recruitment 2024:- सध्या  सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींकरिता हा एक सुवर्णसंधीचा काळ असून केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून अनेक विभागांतर्गत भरती प्रक्रिया सध्या राबवल्या जात आहेत.

अगदी राज्य शासनाच्या जिल्हा परिषदांच्या विविध विभागांतर्गत असो किंवा बँकिंग क्षेत्रात असो यामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

एवढेच नाही तर रेल्वे विभागाच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारच्या भरतीच्या जाहिराती सध्या निघाले आहेत. अशाच प्रकारची भरती आता इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली असून तब्बल 600 पेक्षा जास्त रिक्त जागांकरिता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आयबीमध्ये 600 पेक्षा जास्त पदांवर भरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माध्यमातून इंटेलिजन्स ब्युरो मध्ये विविध पदांकरिता भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून या भरती प्रक्रियेतून एकूण 660 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रामुख्याने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, सामान्य केंद्रीय सेवा आणि एसए अशा विविध पदांकरिता होणार आहे.

 अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख

इंटेलिजन्स ब्युरोच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या 660 पेक्षा अधिक रिक्त जागांकरिता भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया 30 मार्च 2024 पासून सुरू झालेली आहे.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून इंटेलिजन्स ब्युरो मध्ये जी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 आहे.

 किती लागेल शैक्षणिक पात्रता?

इंटेलिजन्स ब्युरोच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक असतील त्या उमेदवाराकडे बॅचलर पदवी असणे गरजेचे आहे व त्यासोबत सुरक्षा किंवा गुप्तचर विभागात दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

 निवड झाल्यानंतर किती मिळेल वेतन?

या इंटेलिजन्स ब्युरोच्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना पद आणि पात्रतेनुसार १९९०० रुपयांपासून ते एक लाख 51 हजार 100 रुपये पर्यंत प्रति महिना वेतन मिळेल.

 अर्ज करण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा

याबाबत गृह मंत्रालयाकडून जी अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यानुसार बघितले तर या भरती करिता जे उमेदवार अर्ज करतील त्यांची वयोमर्यादा पदनिहाय वेगवेगळी आहे. यामध्ये उमेदवाराचे वय 54 वर्षापेक्षा जास्त नसावे. आवश्यक वयाबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या संबंधीची अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

 अर्ज करण्यासाठी किती लागेल शुल्क?

इंटेलिजन्स ब्युरो मार्फत राबविण्यात येणाऱ्या या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराला 450 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवाराला फी मध्ये शंभर रुपयांची सवलत मिळणार आहे.

 अर्ज कुठे पाठवणार?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. आवश्यक अर्ज हा आयबीच्या वेबसाईटवर दिलेल्या नोटीस मधून प्रोफॉर्मा डाऊनलोड करावा आणि तो भरून पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 असून या तारखेनंतर जे अर्ज प्राप्त होतील ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.

 अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवणार?

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा असून त्यासाठीचा पत्ता..

संयुक्त उप निदेशक/ जी-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृहमंत्रालय, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe