Indian Coast Guard Bharti 2023 : 10, 12 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी; ताबडतोब करा अर्ज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Coast Guard Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक दल अंतर्गत सध्या भरती सुरु असून या भरतीसाठी 10, 12 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, जे उमेदवार स्वतःसाठी चांगली नोकरी शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा आणि आपले अर्ज सादर करावेत.

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत “नाविक (देशांतर्गत शाखा), नाविक (जनरल ड्युटी), यांत्रिक” पदांच्या एकूण 350 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव आणि रिक्त जागा 

या भरती अंतर्गत नाविक (देशांतर्गत शाखा), नाविक (जनरल ड्युटी), यांत्रिक पदांच्या एकूण 350 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

परीक्षा शुल्क

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून 300/- रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 22 वर्ष इतके असावे.

अर्ज पद्धती

येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून, खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.indiancoastguard.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-उमेदवार https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login या लिंकद्वारे अर्ज सादर करू शकतात.
-सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अन्यथा अर्ज अपूर्ण समजून नाकारले जातील.
-येथे अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
-येथे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.