Job In Army: भारतीय सैन्यामध्ये अधिकारी व्हायची इच्छा आहे का? चालून आली आहे मोठी संधी! असा करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Job In Army:- अनेक तरुण विविध प्रकारच्या भरती आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपल्याला दिसून येतात. त्यातल्या त्यात जर आपण भारतीय सैन्य दलाचा विचार केला तर प्रामुख्याने आर्मीमध्ये भरती होण्याकरिता शहरी भागच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागाचे तरुण तयारी करत असतात.

तसेच काही तरुण हे भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतात. अशा प्रकारच्या ज्या तरुणांना भारतीय सैन्यांमध्ये थेट अधिकारी होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक मोठी संधी चालून आलेली आहे.

विशेष या भरतीअंतर्गत आता तरुणच नाही तर मुलींना देखील लष्कराच्या या भरती करिता अर्ज करता येणे शक्य होणार आहे. नेमकी ही प्रक्रिया कशी आहे? यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी? त्याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.

 भारतीय सैन्य दलात थेट अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याची मोठी संधी सध्या उपलब्ध झाली असून तरुणांसोबत आता तरुणींना देखील या लष्कराच्या भरतीकरिता अर्ज करता येणे शक्य होणार आहे.

ही संधी एनसीसी विशेष एन्ट्री स्कीम अर्थात योजनेअंतर्गत असून यामध्ये एनसीसी कॅडेट ची थेट भरती सैन्य दलात केली जात असून अंतिम निवड झाली तर सैन्यात लेफ्टनंट पदावर तात्पुरती नियुक्ती तरुण-तरुणींना मिळण्यास मदत होणार आहे.

 अर्ज प्रक्रिया सुरू

लष्कराच्या या भरती करता जे पात्र आणि इच्छुक उमेदवार असतील त्यांना आठ जानेवारीपासून अर्ज करता येणार आहे व ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. तुम्हाला जर या भरती विषयी अधिकची माहिती हवी असेल तर ती

https://joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर मिळू शकेल. एवढेच नाही तर या संकेतस्थळावरच इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरती विषयी लक्षात घेण्याची बाब म्हणजे ही भरती 56 व्या एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम अंतर्गत सुरू आहे.

 कशी केली जाईल निवड?

एनसीसी स्पेशल एन्ट्री योजनेच्या माध्यमातून सर्विस सिलेक्शन बोर्ड अर्थात एसएसबी पाच दिवसांची मुलाखत घेईल व यामध्ये अनेक फेऱ्या असतील. एवढेच नाही तर या दरम्यान शारीरिक आणि बौद्धिक चाचण्या देखील घेतल्या जातात. भोपाल, बेंगलोर तसेच प्रयागराज आणि जालंदर मधील केंद्रांवर या मुलाखती होतात

व या सर्व मुलाखतींच्या फेऱ्या पार पाडल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जातो. उमेदवार यामध्ये यशस्वी ठरतात त्यांची ट्रेनिंग अकादमी मध्ये 49 आठवड्यांचे ट्रेनिंग त्यांना मिळते. हे ट्रेनिंग उत्तीर्ण झाल्यानंतर लेफ्टनंट पदावर नियुक्ती केली जाणार आहे.

 नियुक्ती झाल्यानंतर किती मिळणार वेतन?

या अंतर्गत जे उमेदवार नियुक्त किंवा ज्यांची निवड केली जाईल अशा उमेदवारांना 56 हजारापासून ते पावणे दोन लाखापर्यंत वेतन मिळणार आहे.