SBI Recruitment 2024:- विविध प्रकारच्या भरती परीक्षांच्या संदर्भात जर आपण बघितले तर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर विविध परीक्षांची तयारी करताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये स्पर्धा परीक्षांपासून तर रेल्वे खात्याच्या परीक्षा असो किंवा बँकिंग क्षेत्रातल्या याकरिता रात्रंदिवस विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तयारी केली जाते.
सध्या जर आपण बघितले तर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत अनेक रिक्त पदांसाठीच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे विभाग आणि बँकिंग क्षेत्राचा प्रकर्षाने समावेश करता येईल.
जर तुम्ही देखील बँकिंग क्षेत्रातल्या परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी असून देशातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाचे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून ही भरती प्रक्रिया तब्बल 1511 पदांसाठी जाहीर करण्यात आलेली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 1511 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशातील अग्रगण्य बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 1511 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या भरती साठीची अर्ज प्रक्रिया देखील 14 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आलेली आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 ही होती. परंतु आता अर्ज करण्यासाठीच्या अंतिम तारखेत वाढ करण्यात आली असून ती आता 14 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आलेली आहे.
म्हणजेच आता इच्छुक आणि पात्र उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरती करिता 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
पदनिहाय रिक्त पदांची संख्या
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये स्पेशालिस्ट कॅडर करिता 1511 रिक्त जागांसाठी ही भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये डेप्युटी मॅनेजर( सिस्टम) आणि असिस्टंट मॅनेजर( सिस्टम) यांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरती मधील पदनिहाय रिक्त पदे पाहिली तर ती….
1- डेप्युटी मॅनेजर( सिस्टम)- इन्फ्रा सपोर्ट अँड क्लाऊड ऑपरेशन– एकूण रिक्त जागा 412
2- डेप्युटी मॅनेजर( सिस्टम) प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी– एकूण रिक्त जागा 187
3- डेप्युटी मॅनेजर( सिस्टम ) नेटवर्किंग ऑपरेशन– एकूण रिक्त जागा ऐंशी
4- डेप्युटी मॅनेजर( सिस्टम) आयटी आर्किटेक्ट– एकूण रिक्त जागा 27
5- डेप्युटी मॅनेजर( सिस्टम) इन्फॉर्मेशन सिक्युरिटी– एकूण रिक्त जागा सात
6- असिस्टंट मॅनेजर( सिस्टम) एकूण रिक्त जागा 798
अशा एकूण रिक्त पदांची संख्या 1511 इतके आहे.
काय आहे या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता?
या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार हा कुठल्याही विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इंजिनीयर आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बीटेक/ बीई/ एमसीए असणे आवश्यक आहे.
तसेच टेक / एमएससी पदवी असणे गरजेचे आहे. परंतु यामध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळे आहेत.याकरिता अर्ज करण्यापूर्वी या भरतीचे अधिकृत अधिसूचना उमेदवारांनी व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
स्टेट बँकेच्या या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा
या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांचे वय किमान 21/ पंचवीस वर्षापासून ते कमाल 30/35 वर्ष असणे गरजेचे आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल वेतन?
या भरतीमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची वेतनश्रेणी बघितली तर डेप्युटी मॅनेजर पदासाठीच्या उमेदवारांना दरमहा रुपये 64,820 ते 93 हजार 960 रुपये वेतन दिले जाईल.
तसेच ज्या उमेदवारांची निवड असिस्टंट मॅनेजर या पदासाठी होईल त्यांना मूळ वेतन 48,480 ते 85 हजार 920 रुपये इतके दरमहा वेतन दिले जाईल. तसेच इतर प्रकारचे भत्त्यांचा लाभ देखील मिळेल.
अर्ज करण्यासाठी किती लागेल शुल्क?
एसबीआय च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या ओबीसी/ ईडब्ल्यूएस आणि जनरल कॅटेगिरीतील उमेदवारांना अर्जासाठी 750 रुपये इतके शुल्क भरावे लागेल. तर एससी/ एसटी आणि पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.