Maharashtra Bharti 2023: लिपिक-टंकलेखक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लेखापाल पदांसाठी मोठी भरती, वाचा संपूर्ण माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Bharti 2023:- सध्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून विविध परीक्षांच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता हा काळ एक सुवर्णसंधीचा काळ आहे असेच म्हणावे लागेल. याच भरतीच्या अनुषंगाने जर आपण केंद्रीय पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालय नवी दिल्ली त्यांचा विचार केला तर त्यांनी 18 जानेवारी 2019 रोजी एक नवीन सीआरझेड जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे व या सदर  अधीसूचनेची अंमलबजावणी करण्याकरता महाराष्ट्र राज्याकरिता महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे.

या अनुषंगाने पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई या ठिकाणी प्राधिकरणाचे जे काही दैनंदिन कामकाज आहे त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांचे तात्पुरत्या कालावधीकरिता रिक्त पदे भरायचे आहेत व याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. याचा अनुषंगाने या लेखात आपण या भरतीविषयी ए टू झेड माहिती बघणार आहोत.

 रिक्त पदाचे नाव तसेच पदसंख्या, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

1- विधी अधिकारी विधी अधिकारी या पदाची रिक्त संख्या एक असून याकरिता शैक्षणिक पात्रता ही विधी विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक असणार आहे. तसेच या पदाकरिता लागणारे अनुभवाचा विचार केला तर कमीत कमी दहा वर्षे पर्यावरण तसेच प्रदूषण विषयाशी निगडित विधिविषयक( न्यायालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य ) कामाचा अनुभव आवश्यक असणार आहे.

2- प्रकल्प विश्लेषक प्रकल्प विश्लेषक या पदासाठी एक जागा रिक्त असून याकरिता शैक्षणिक पात्रता ही अभियांत्रिकी कमीत कमी पर्यावरण शास्त्र व त्या संबंधित विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदवीधर पदवी असणे गरजेचे आहे. किमान पाच वर्षे सागरी क्षेत्राचे संवर्धन, संरक्षण व व्यवस्थापन विकास कामाचे पर्यावरण आघात मूल्यांकन इत्यादी कामांचा अनुभव असणे गरजेचे आहे व शासकीय कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे.

3- कोस्टल समन्वयक या पदाच्या तीन जागा रिक्त असून याकरिता अभियांत्रिकी पर्यावरण कमीत कमी शास्त्र व तत्सम विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा  पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे. अनुभवाचा विचार केला तर याकरिता कमीत कमी तीन वर्षे सागरी क्षेत्राच्या संवर्धन संरक्षण व पर्यावरण शास्त्र व व्यवस्थापन विकास कामांचे पर्यावरण आघात विषयातील मूल्यांकन इत्यादी कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. शासकीय कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे.

4- लेखापाल या पदाची एक जागा रिक्त असून कॉमर्स विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर  पदवी यासाठी आवश्यक आहे. या पदाकरिता कमीत कमी तीन वर्षे शासकीय कार्यालयातील कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

5- लघुलेखक या पदाची एक जागा रिक्त असून याकरिता शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच लघुलेखनाचा  विचार केला तर यामध्ये 100 शब्द प्रति मिनिट मराठी तसेच टंकलेखनामध्ये प्रती शब्द प्रति मिनिट मराठी आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी इतका टायपिंगचा वेग असणे गरजेचे आहे. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. या पदासाठी किमान तीन वर्षे शासकीय कार्यालयातील कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

6- लिपिकटंकलेखक या पदाची एक जागा रिक्त असून या पदाकरिता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि टंकलेखनामध्ये मराठी 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट इतका टायपिंग चा वेग असणे गरजेचे आहे व शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक राहील. अनुभवाचा विचार केला तर किमान तीन वर्षे शासकीय कार्यालयातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

7- डाटा एंट्री ऑपरेटर या पदाची एक जागा रिक्त असून या पदाकरिता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि टंकलेखनामध्ये इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट इतका टायपिंगचा स्पीड आणि शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक राहील. शासकीय कार्यालयातील या कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

 या भरतीसाठी अर्ज कुठे पाठवावा?

या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचे वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अहर्ता आणि पूर्वानुभावाची माहितीसह 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत recruitment-envcc@mah.gov.in या मेल आयडीवर पाठवणे गरजेचे आहे. त्यानंतर अहर्ता प्राप्त असलेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावले जाणार आहे.