तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 80 हजार, पहा…


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 66 पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नुकतीच अधिसूचना जारी झाली आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील एका मोठ्या महानगरपालिकेमध्ये 66 पदांच्या रिक्त जागांसाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित झाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 66 पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नुकतीच अधिसूचना जारी झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आज आपण कोणत्या रिक्त पदांसाठी महापालिकेत भरती होणार आहे, यासाठी अर्ज कसा करावा लागणार, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक, यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास होणार सुसाट, प्रवाशांच्या अर्धा तासाचा वेळ वाचणार; प्रकल्पाचे काम केव्हा होणार पूर्ण ? MSRDC अधिकारी म्हणतात….

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती?

कनिष्ठ निवासी, CMO, वैद्यकीय अधिकारी (पोस्टमार्टेम सेंटर), ब्लड बँक BTO या पदाच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती रिक्त जागांसाठी होणार भरती?

अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार कनिष्ठ निवासी या पदाच्या 56 जागा भरल्या जाणार आहेत. सीएमओ या पदाच्या पाच रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी पोस्टमार्टम सेंटर या पदाच्या 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ब्लड बँक बी टी ओ या पदाच्या दोन रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ निवासी, सीएमओ, वैद्यकीय अधिकारी पोस्टमार्टम सेंटर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार एमबीबीएस पदवी उत्तीर्ण तसेच एमएमसी रजिस्टर अद्ययावत असणे आवश्यक आहे. तसेच ब्लड बँक BTO या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार एमबीबीएस/ DCP पदवी उत्तीर्ण तसेच MD Path प्राधान्य, एमएमसी रजिस्टर अद्ययावत असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रते संदर्भात आणि अनुभवा संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मात्र उमेदवारांनी एकदा अधिसूचना वाचणे जरुरी राहणार आहे.

हे पण वाचा :- मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास होणार सुसाट, प्रवाशांच्या अर्धा तासाचा वेळ वाचणार; प्रकल्पाचे काम केव्हा होणार पूर्ण ? MSRDC अधिकारी म्हणतात….

किती वेतन मिळणार

वर नमूद केलेल्या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 64 हजार 551 ते 80 हजार रुपये इतकं दरमहा वेतन दिल जाणार आहे. याबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

या पदासाठी इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने 31 मे 2023 पर्यंत सादर करता येणार आहे. यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. 

हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार नाही सातवा वेतन आयोगाची थकबाकी? वाचा…