Career Tips After 12th:- बारावी हे शैक्षणिक वर्ष करिअरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असे शैक्षणिक वर्ष म्हणून ओळखले जाते.संपूर्ण आयुष्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष एक टर्निंग पॉईंट समजले जाते.
कारण बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला अनेक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो व हे अभ्यासक्रम तुमच्या भविष्याचा पाया मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात व अशा कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही तुमचे करिअर यशस्वीरित्या घडवू शकतात.
तुम्ही जर बारावी कॉमर्स उत्तीर्ण असाल तर त्यानंतर तुम्ही काही महत्त्वाच्या कोर्सेसला ऍडमिशन घेऊन तुमचे करिअर उज्वल असे करू शकतात व भविष्यात लाखो रुपये पॅकेजची नोकरी मिळवू शकतात.
बारावी कॉमर्स उत्तीर्ण झाल्यानंतर करा हे अभ्यासक्रम
1- चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सीए– चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीए होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असते. चार्टर्ड अकाउंटंट होण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट घ्यावे लागतात. चार्टर्ड अकाउंटंट होण्याकरिता तुम्हाला अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते.
चार्टर्ड अकाउंटंटचे काम हे ऑडिट अकाउंट, टॅक्स तसेच वर्क अकाउंटिंग, आर्थिक सल्ला इत्यादींचे विश्लेषण करणे हे आहे. बारावीनंतर चार वर्षे तुम्हाला सीए होण्यासाठी लागतात व सीए झाल्यानंतर तुमचा पगार काही वर्षात लाखो रुपयांपर्यंत पोहोचतो.
2- कंपनी सेक्रेटरी अर्थात सीएस– चार्टर्ड अकाउंटंट होण्याप्रमाणेच कंपनी सचिव अर्थात कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी देखील खडतर परीक्षांना सामोरे जावे लागते. याकरिता तुम्हाला यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकुन देऊन तयारी करावी लागेल.
3- बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात बीबीए– कॉमर्स शाखेतून बारावी पास झालेल्यांनाही हा अभ्यासक्रम करता येतो. हा तीन वर्षांचा पदवी स्तरावरील अभ्यासक्रम असून ज्या अंतर्गत व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रशासन शिकवले जाते.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला खाजगी क्षेत्रात सहजपणे नोकरी मिळू शकते व तुमचा अनुभव जसा वाढेल तसा तुम्हाला या क्षेत्रात लाखो रुपयांमध्ये पगार मिळू शकतो.
4- हे आहेत इतर पर्याय– या पर्याव्यतिरिक्त तुम्ही इव्हेंट मॅनेजर, बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अर्थात बीएमएस, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट अर्थात सीएमए, सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर इत्यादी अभ्यासक्रमांना देखील प्रवेश घेऊ शकतात.
हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही खाजगी क्षेत्रांमध्ये सहजरित्या चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकतात. बारावीनंतर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये देण्यात येणाऱ्या परीक्षांची देखील तयारी करू शकतात व यासाठी कॉमर्स विषय घेऊन बारावी पास असणे महत्त्वाचे असते.