Pune Bharti 2023 : तुम्हीही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे, जर तुम्ही पुण्यात असाल आणि पुण्यात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. सध्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे येथे विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जाते जात आहेत. तुम्ही येथे नोकरी करू इच्छित असाल तर ही संधी उत्तम आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे येथे सुरु असलेल्या भरती अंतर्गत “अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक, GDMO, विशेषज्ञ” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर 23 व 28 ऑगस्ट 2023 रोजी मुलाखतीस हजर राहायचे आहे. (पदांनुसार)
भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक, GDMO, विशेषज्ञ पदांच्या रिक्त जाणार भरल्या जाणार असून, इच्छुक उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल, तरी मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे होणार आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
इच्छुक उमेदवार ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे -37, येथे कार्यालयीन वेळेत देय तारखेला हजर राहू शकतात.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 23 व 28 ऑगस्ट 2023 आहे. (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट
भारती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार www.esic.nic.in या वेबसाईटला भेट देऊ शकतो.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
-मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
-मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
-मुलाखतीची तारीख 23 व 28 ऑगस्ट 2023 आहे. (पदांनुसार )
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.