Pune Bharti 2023 : 10वी पास उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी; ऑनलाईन करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Army HQ Southern Command Bharti 2023 : पुण्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. HQ दक्षिणी कमांड अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे, या भरतीसाठीची जाहिरात देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

HQ दक्षिणी कमांड येथे MTS(मेसेंजर), MTS(Daftary), कुक, वॉशरमन, मजदूर, MTS(माळी) पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार असून, पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव आणि रिक्त जागा

या भरती अंतर्गत MTS(मेसेंजर), MTS(Daftary), कुक, वॉशरमन, मजदूर, MTS(माळी) पदांच्या एकूण 24 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण 10th पास असावे.

वयोमर्यादा

लक्षात घ्या येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे इतके असावे.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई, पुणे, देवळी आणि अहमदनगर येथे होत आहे, तुम्ही शहरानुसार येथे अर्ज सादर करू शकता.

अर्ज पद्धती

येथे उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्यासाठी 5 ऑक्टोबर 2023 ही अंतिम तारीख असेल.

अधिकृत वेबसाईट

तुम्हाला या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही www.hqscrecruitment.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.

असा करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज पद्धतीने ऑनलाईन पाठवायचे आहेत.
-उमेदवार https://www.hqscrecruitment.in/NewRegistration.php या वेबसाईटद्वारे अर्ज सादर करू शकतो.
-लक्षात घ्या अर्ज फक्त वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत, इतर कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर वर दिलेल्या लिंकवर सादर करावे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने देखील आवश्यक आहे.
-भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.