सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! Hindustan कॉपर लिमिटेडमध्ये मोठी भरती; जवळ आली अर्जाची अंतिम तारीख

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) कडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत टेक्निकल आणि वर्कशॉप विभागातील विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

Ratnakar Ashok Patil
Published:

Recruitment In HCL 2025:- जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) कडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत टेक्निकल आणि वर्कशॉप विभागातील विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२५ असून इच्छुक उमेदवार hindustancopper.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

भरतीची महत्वाची माहिती

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १० जानेवारी २०२५ पासून सुरू झाली आहे. अर्जदारांना लेखी परीक्षेला सामोरे जावे लागेल. जी १५ मार्च २०२५ रोजी होण्याची शक्यता आहे.

मात्र काही परिस्थितींमध्ये परीक्षा तारखेत बदल होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी अपडेट तपासणे आवश्यक आहे.

भरतीसाठी आवश्यक पात्रता

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा पूर्ण करणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ चार्जमॅन (इलेक्ट्रिकल) पदासाठी डिप्लोमा किंवा आयटीआय (इलेक्ट्रिकल) आवश्यक आहे आणि संबंधित क्षेत्रात किमान एक वर्षाचा अनुभव असावा. तसेच इतर पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक अटी लागू आहेत.
अर्ज करण्याची प्रक्रिया

hindustancopper.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

‘Careers’ किंवा ‘Recruitment’ विभागावर क्लिक करा.

संबंधित पदासाठी भरती लिंक निवडा.

नवीन खाते तयार करून आवश्यक माहिती भरा.

अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरा.

संपूर्ण माहिती तपासून अर्ज सबमिट करा व प्रिंटआउट काढून भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.

वयोमर्यादा आणि सवलती

या भरतीसाठी उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) यांना वयोमर्यादेत शासकीय नियमानुसार सवलत देण्यात येईल.

अर्ज शुल्क

सामान्य (General आणि OBC (नॉन क्रीमी लेयर) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १००० आहे.SC/ST/EWS/PWD/माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे.अर्ज शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.
निवड प्रक्रिया कशी असेल?

सर्वप्रथम उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची आणि कागदपत्रांची छाननी केली जाईल.निवड प्रक्रियेतील पहिला टप्पा लेखी परीक्षा असेल.ज्यामध्ये तांत्रिक ज्ञान आणि सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारले जातील.काही पदांसाठी ट्रेड टेस्ट किंवा प्रॅक्टिकल टेस्ट घेतली जाणार आहे.परीक्षेतील कामगिरीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe