Recruitment In Isro: 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना देखील आता इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
job in isro

Recruitment In Isro:- नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक तरुण-तरुणीसाठी सध्या काही दिवसांपासून अनेक नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध होताना दिसून येत असून हे अंतर्गत विविध जिल्हा परिषदा तसेच अनेक शासकीय विभागाच्या भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत.

त्या अनुषंगाने सध्या वनरक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. कोरोना कालावधीपासून सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया या थांबवण्यात आलेल्या होत्या. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून भरती प्रक्रियांना वेग देण्यात आलेला आहे. त्यामुळे विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा काळ सुवर्णसंधीच आहे असे म्हणावे लागेल.

अगदी याच पद्धतीने जर आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचा विचार केला तर या ठिकाणी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे. याकरिता महत्त्वाचे असे नोटिफिकेशन देखील इस्रोच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे. या लेखांमध्ये याच भरती प्रक्रिया विषयीची माहिती आपण घेऊ.

 इस्रोमध्ये दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो अंतर्गत तंत्रज्ञ तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक/ अभियंता आणि ड्रायव्हर या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून याकरिता आवश्यक अशी अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. जे उमेदवारी इच्छुक आणि पात्र असतील त्या उमेदवारांना यासंबंधीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.

 आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदांकरिता जे उमेदवार अर्ज करतील ते उमेदवार मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेच परंतु त्यासोबत उमेदवाराकडे आयटीआय/ बीएससी / डिप्लोमा इन इंजीनियरिंग/बीई/ बीटेक/ एमटेक/ एमइ आणि एमएससी सारखी पदवी असणे आवश्यक आहे.

 अर्ज करण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेले जे उमेदवार इस्रो मधील या रिक्त पदासाठी अर्ज करतील त्या उमेदवारांचे किमान 18 ते  कमाल 35 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

 निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?

या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना 65,554 रुपये ते ८१९०६ रुपयापर्यंत पगार दिला जाणार आहे.

 किती आहे अर्ज करण्यासाठीचे शुल्क?

या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करतील अशा आरक्षित  उमेदवारांकडून 250 रुपये तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 750 रुपये इतके प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहे.

 उमेदवारांची निवड कशी केली जाईल?

या रिक्त पदांसाठी जे उमेदवार अर्ज करतील त्यांची निवड लेखी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे व जे उमेदवार घेण्यात आलेली ही लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलावली जाईल व यासंबंधीची माहिती उमेदवारांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर कळविण्यात येणार आहे.

 कसा कराल अर्ज?

इस्रोमधील या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम यासाठीच्या अधिकृत वेबसाईट www.ursc.gov.in वर जावे व त्यानंतर करिअर सेक्शन खाली रिक्रुटमेंटवर क्लिक करावे. त्यानंतर अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करून त्या ठिकाणी विचारलेल्या सर्व तपशील भरावा आणि डॉक्युमेंट अपलोड करावे. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट घ्यावी.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरतीसाठी जर तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत करू शकणार आहात. यामध्ये अर्ज करताना तो व्यवस्थितरित्या भरणे गरजेचे आहे व यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल याची देखील उमेदवारांनी नोंद घेणे गरजेचे आहे.

अधिक माहिती करिता अधिकृत संकेतस्थळावर जावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe