Recruitment News 2024:- सध्या मोठ्या प्रमाणावर केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जात असून बऱ्याच भरती प्रक्रियांचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत व काहींच्या अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्यांच्या करिता देखील विविध बँकांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत.
यामध्ये विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या बऱ्याच उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. याच पद्धतीने दहावी पास असलेल्या उमेदवारांना टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून या ठिकाणी असलेल्या विविध रिक्त पदे भरण्यासाठी नुकतीच जाहिरात निघालेली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी केवळ दहावी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये परीक्षा किंवा इतर प्रक्रिया नसून फक्त मुलाखत द्यावी लागणार आहे.
टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे फायरमन आणि सब ऑफिसर( फायर) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून यामध्ये दहावी पास असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
टाटा मेमोरिअल सेंटर मुंबई येथे राबवण्यात येत असलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये फायरमन या रिक्त पदाकरिता उमेदवार अग्निशमन विभागातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यासोबतच सब ऑफिसर( फायर)- या पदाकरिता उमेदवार हा दहावी उत्तीर्ण व सब ऑफिसर अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे?
टाटा मेमोरियल सेंटर मुंबईच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या फायरमन व सब ऑफिसर( फायर) या पदासाठी राबवण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये निवड ही कुठल्याही लेखी परीक्षा विना म्हणजेच फक्त मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
काय आहे मुलाखतीची तारीख?
या दोन्ही रिक्त पदांकरिता घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीची तारीख ही 10 एप्रिल 2024 आहे.
कोणत्या ठिकाणी घेतली जाणार आहे मुलाखत?
या भरतीमध्ये ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना मुलाखत द्यायची असेल ते 10 एप्रिल 2024 रोजी 3rd floor, Khanolkar Shodhika, TMC-AICTREC, Sec-22, Kharghar Navi Mumbai-410 210 या पत्त्यावर संपर्क साधू शकतात.
किती लागेल वयोमर्यादा?
टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे व याकरिता कुठल्याही प्रकारची परीक्षा फी आकारली जाणार नाही.
निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल वेतन?
या भरती प्रक्रियेमध्ये रिक्त पदांकरिता ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 23800 ते चाळीस हजार रुपये दरमहा वेतन दिले जाईल.
नोकरीचे ठिकाण कोणते आहे?
या भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांचे नोकरीचे ठिकाण मुंबई या ठिकाणी असेल.
या भरतीची अधिकृत वेबसाईट
www.actrec.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे.