Teacher Recruitment 2024:- राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांचे पदे रिक्त होती व या रिक्त पदांच्या भरती करिता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये लोकसभा निवडणूक 2024 ची घोषणा झाली
व आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही सुरू असलेली भरती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे ही रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होणार याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया होणार पुन्हा सुरू
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरण्याकरता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात होती व मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आचारसंहिता लागल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती.
परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही शिक्षक भरती प्रक्रिया राबवायला परवानगी मिळाली असून त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्यामुळे खूप मोठा दिलासा उमेदवारांना मिळाला आहे.
आतापर्यंत राबवण्यात आलेली भरती प्रक्रिया
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 25 फेब्रुवारी 2024 रोजी मेरिटनुसार जे काही उमेदवार पात्र होते त्यांच्या निवडीकरिता शिफारस असलेली साधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू देखील करण्यात आलेले होते.
परंतु मध्येच लोकसभा 2024 निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला व त्यामुळे संपूर्ण देशांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नियमानुसार साहजिकच आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाही करण्यावर निर्बंध आले. परंतु या भरती विषयीची तातडी आणि त्यासोबतच न्यायालयीन आदेश विचारात घेता ही नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळवण्याकरिता राज्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनाच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्यासंबंधीचा प्रस्ताव सादर केला होता
व या प्रस्तावाला अनुसरून केंद्रीय निवडणूक आयोगाने आता या नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात उपरोक्त कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. एवढेच नाही तर या संबंधीचे पत्र देखील शिक्षण आयुक्त कार्यालयाला 19 एप्रिलला प्राप्त झालेले आहे
व त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देखील देण्यात आले आहे. यासंबंधीची माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे. त्यामुळे नक्कीच आता ही रखडलेली भरती कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.