Railway Bharti Time-Table:- सध्या रेल्वे विभागाच्या माध्यमातून विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून काही भरती प्रक्रियांसाठी आवश्यक असलेली अर्ज प्रक्रिया सुरू आहे तर काही भरती प्रक्रियांच्या परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहे.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी रेल्वे भरती बोर्डाच्या विविध जागांसाठी घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेला असेल त्यांच्यासाठी एक आनंदाची अशी बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाच्या माध्यमातून लोको पायलट, आरपीएफ एसआय,
टेक्निशियन तसेच जेईसह इतर पदांच्या रिक्त जागांच्या भरती करिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
त्यामुळे याकरिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले होते त्यांना त्यांची परीक्षा अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे. साधारणपणे यासाठीची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येणार असून या माध्यमातून 5696 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
रेल्वे भरती बोर्डाच्या विविध 5,696 जागांसाठीची परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
रेल्वे भरती बोर्डाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या लोको पायलट तसेच आरपीएफ एसआय, जेई व टेक्निशियनसाठी इतर पदांच्या जागांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. याकरिता ज्या उमेदवारांनी अर्ज नोंदणी केली होती त्यांच्या परीक्षा अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात या परीक्षा होणार असून या माध्यमातून 5696 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. रेल्वे भरती बोर्डाच्या वतीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बघितले तर उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्र, जिल्हा वेळापत्रकासह हॉल तिकीट कुठे आणि कसे मिळेल या संबंधीची माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार…
लोको पायलट या पदासाठीची भरती परीक्षा ही 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या दरम्यान होणार असून उमेदवारांनी निवडलेले अथवा त्यांना केंद्र आलेले शहर याची सूचना देणारी स्लिप 15 नोव्हेंबरला जाहीर केली जाणार आहे. यामध्ये उमेदवारांनी निवडलेले परीक्षेचे केंद्र देखील उमेदवारांना पाहता येणार आहे.
आरपीएफ एसआय भरतीसाठीची परीक्षा ही दोन ते पाच डिसेंबर दरम्यान होणार आहे व या परीक्षेचे हॉल तिकीट बावीस नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे तर 29 नोव्हेंबर रोजी ते डाऊनलोड करून घेता येणार आहे.
रेल्वे भरती बोर्डाच्या टेक्निशियन पदासाठीची भरती परीक्षा 16 ते 26 डिसेंबर दरम्यान होणार आहे व परीक्षा केंद्र तसेच इतर माहिती सहा डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच यासाठीचे हॉल तिकीट 13 डिसेंबर रोजी देण्यात येणार आहे.
जेईसह इतर पदांच्या परीक्षा सहा ते 13 डिसेंबर दरम्यान होतील व केंद्र असलेल्या शहरांची यादी 26 नोव्हेंबरला जाहीर केली जाणार आहे तर 3 डिसेंबरला यासाठीचे हॉल तिकीट मिळणार आहे.
कशी होईल लोको पायलटची निवड?
रेल्वे भरती बोर्डाच्या माध्यमातून सहाय्यक लोको पायलटच्या जागांची भरती ही पाच स्तरावरील परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामध्ये पहिली कम्प्युटर बेस्ड म्हणजेच सीबीटी पद्धतीने परीक्षा आणि दुसरी परीक्षा आधी होईल. यामध्ये निवड झाल्यावर ऑनलाईन परीक्षा होईल व त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल चाचणीनंतर अंतिम निवड केली जाणार आहे.