file photo

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :-अभिनेत्री करिना कपूर या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असते. तर गेल्या काही दिवसांपासून करिना तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आली आहे. तिच्या पुस्तकाचं नाव करिना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल असं नाव आहे.

करिनाने ९ ऑगस्टला तिचा मित्र दिग्दर्शक करण जोहरबरोबर इन्स्टाग्राम लाइव्ह करत प्रकाशित केलं. या वेळी करणच्या प्रत्येक प्रश्नाला करिनाने फार खास उत्तर दिली. करणने विचारलं, पहिल्या गर्भधारणेच्या तुलनेत दुसरी गर्भधारणा तिच्यासाठी तठीण होती असं म्हणत करीना म्हणाली, दुसरी गर्भधारणा माझ्यासाठी खूप कठीण होती.

तैमुरच्यावेळी मला इतका त्रास झाला नाही जितका जेहच्या वेळी झाला. पुढे तो काळ तिच्यासाठी कसा होता हे सांगत करीना म्हणाली, ‘मला त्या वेळी खूप आनंद झाला. त्यामुळे मी पुढे दुसऱ्या बाळाचा विचार केला. पण दुसऱ्यांदा परिस्थिती बदलली. मला अनेक समस्या आल्या.

त्यामुळे मला असे वाटत होते की मी हे करू शकणार नाही आणि भविष्यात काहीही ठीक होणार नाही. प्रेग्नंट असताना नवऱ्याने बायकोला आधार देणं गरजेचं असते. तिच्यावर कोणताच दबाव आणता कामा नये. जेव्हा आपण गर्भवती असतो तेव्हा दुसऱ्यांना वाटतं की आपल्याला सेक्सचा मूड आणि त्या भावना येत नाही.

या काळात स्त्री स्वतःला खूप खास आणि सेक्सी समजत असते. तुमच्या पतीला तुम्हाला आधार द्यावा लागतो आणि त्यावेळी सैफने मला खूप मदत केली. अगदी सैफने देखील ही गोष्ट मान्य केली.

गरोदरपणात करीना अतिशय सुंदर दिसत होती.’सहव्या आणि सातव्या महिन्यात खूप थकवा जाणवतो. त्या काळात जोडीदाराचा किंना जवळच्या व्यक्तीचा आधार असणे खूप महत्त्वाचे असते. अशावेळी आपल्या जोडीगाराने सेक्स लाईफ सुपर एक्टिव्ह असेल अशी अशा करणं चुकीचं आहे.