अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- कोतवाली पोलीसांनी नगर शहरांमध्ये तीन ठिकाणी सुगंधी तंबाखू साठ्यावर छापेमारी करत साठा जप्त केला आहे. तसेच घटनास्थळावरून आरोपींना अटक केली.

या तीन आरोपींना न्यायालयाने 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. शहरात कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत गोंधळेगल्ली,

माळीवाडा बुरुडगाव रोड भोसले मंगल कार्यालयजवळ व जिपीओ चौक ते धरतीचौक परिसरात मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू मावा बनविण्यासाठी साठवून ठेवण्यात आलेली आहे. त्याठिकाणी पोलीस निरिक्षक शिंदे यांनी पथके तयार छापेमारी केली.

यात गोंधळेगल्लीत संतोष प्रकाश सोनवणे (वय 34, रा. सर्जेपुरा) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख 80 हजार रुपये किंमतीचे 100 किलो सुगंधी तंबाखु, बुरुडगाव रोड भोसले मंगल कार्यालयाजवळ सफल संतोष जैन (वय 35, रा. मोतीनगर, केडगाव) याच्याकडून एक लाख 24 हजार 500 किंमतीचे 70 पुड्यांचे छोटे बॉक्स.

तर धरतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालय रोडवर पॅगो माल वाहतूक टेम्पो (एमएच 16 ए.ई. 967) यामध्ये गोरक्षनाथ धाडगे (वय 36, चालक रा. भिंगार) याल ताब्यात घेऊन त्याच्याकडून 96 हजार 250 रुपये किंमतीचा माल 70 हजारांची लाल रंगाची पॅगो रिक्षा टेम्पो असा असलेली एकूण 1 लाख 66 हजार 250 रुपयांचाचा कायदेशीर कारवाई करुन 3 लाख 70 हजार 750 रुपये किंचा मद्देमाल आरोपीसह ताब्यात घेण्यात आले.