नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याने खडकाळ जमिनीवर पेरूची लागवड केली आणि वर्षाला मिळवला 6 ते 7 लाखाचा नफा

आपल्याकडे एक म्हण आहे की “ज्या ठिकाणी लाथ मारू तिथून पाणी काढू” अगदी याच प्रमाणे जर तुमची इच्छाशक्ती असेल तर शेती कशीही असली तर आपण त्या ठिकाणी कष्ट करू व कोणतेही पिकांचे उत्पादन भरघोस पद्धतीने घेऊ हे वाक्य देखील तितके सत्य होऊ शकते.

Ajay Patil
Published:
peru lagvad

Farmer Success Story:- आपल्याकडे एक म्हण आहे की “ज्या ठिकाणी लाथ मारू तिथून पाणी काढू” अगदी याच प्रमाणे जर तुमची इच्छाशक्ती असेल तर शेती कशीही असली तर आपण त्या ठिकाणी कष्ट करू व कोणतेही पिकांचे उत्पादन भरघोस पद्धतीने घेऊ हे वाक्य देखील तितके सत्य होऊ शकते.

अशाप्रकारे आपण पाहतो की कष्टाच्या जोरावर अनेक शेतकरी जमीन कशीही असली तरी उत्तम तंत्रज्ञान आणि नियोजनाचा वापर करून कुठलेही पीक भरघोस पद्धतीने घेतात. नक्कीच यामध्ये कष्ट तर असतातच परंतु नेमके व्यवस्थापन व अचूक तंत्रज्ञानाचा वापर खूप फायद्याचा ठरतो.

यामुळेच आपल्याला अनेक शेतकरी खडकाळ किंवा माळरान असलेल्या जमिनीवर देखील भरघोस उत्पादन घेतात. इतकेच नाहीतर अशा जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांची लागवड यशस्वी करून सर्व उत्पादन मिळवून लाखोत नफा देखील मिळवतात.

अगदी याच पद्धतीने जर आपण नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापूर येथील शेतकरी आप्पासाहेब वाघ यांची यशोगाथा बघितली तर त्यांनी त्यांच्या खडकाळ माळरान असलेल्या जमिनीवर मोठ्या कष्टाने पेरूची बाग फुलवली व इतकेच नाही तर त्या माध्यमातून लाखोत उत्पन्न देखील ते मिळवत आहेत.

आप्पासाहेब वाघ यांनी खडकाळ माळरान जमिनीवर फुलवली पेरूची बाग
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या ममदापूर या गावचे रहिवासी असलेल्या आप्पासाहेब वाघ हे मुंबई येथील वानखेडे स्टेडियम या ठिकाणी नोकरीला होते. त्यांनी या स्टेडियमवर जवळपास 25 वर्षे नोकरी केली व या नोकरीमध्ये त्यांचे काम होते की त्या ठिकाणी असलेल्या झाडांची देखभाल व निगा ठेवणे हे होय.

पंचवीस वर्षे त्या ठिकाणी नोकरी केल्यानंतर ते रिटायर झाले व गावी राहायला आले. गावी आल्यानंतर आता काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर असताना त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.

परंतु त्यांची शेती खडकाळ माळरानाची होती व या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी कोणते पीक चांगले येईल? याचा शोध घ्यायला सुरुवात केली व यामध्ये पेरू आणि सीताफळ पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पेरूची देखील त्यांनी लागवड केली व या लागवडीतून आज त्यांना उत्पादन मिळायला लागले आहे.

उत्तम असे व्यवस्थापन ठेवल्यामुळे त्यांनी या पेरू बागेतून दर्जेदार असे उत्पादन मिळाले असून त्यांच्या या पेरूंना विदेशात देखील चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे.

अशाप्रकारे केले आहे पेरू बागेचे नियोजन
त्यांनी पेरू बागेची लागवड केली व या बागेच्या चारही बाजूने त्यांनी विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली आहे यामध्ये अनेक फळझाडांचा समावेश त्यांनी केला आहे. शेताच्या सभोवती त्यांनी सफरचंद, जांभूळ, पपई, मोसंबी, ड्रॅगन फ्रुट तसेच नारळ इत्यादी फळपिकांचा समावेश केला आहे.

आज त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने फळबाग फुलवला आहे की हा फळबाग पाहिल्यानंतर अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटते. नोकरी करण्यापेक्षा आपली शेतीच उत्तम हे त्यांनी त्यांच्या या प्रयोगातून दाखवून दिले आहेत.

त्यांना या सगळ्या पेरू शेतीतून वर्षाला सहा ते सात लाख रुपयांचा नफा मिळत असून त्यामुळे त्यांची आर्थिक समृद्धी होण्याच्या दृष्टिकोनातून देखील मदत झाली आहे. पेरूच्या बागेला विहिरीचे पाणीचा वापर व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे ठरल्याचे देखील यामध्ये दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe