महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सोयाबीनच नवीन वाण झालं विकसित ; अवघ्या 90 दिवसातच 45 क्विंटल उत्पादन देणार

Soybean Farming : महाराष्ट्रात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील जवळपास सर्वच विभागात या पिकाची शेती पाहायला मिळते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून आहे.

अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी शास्त्रज्ञांकडून सोयाबीन उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आणि शोध लावले जातात. सोयाबीनच्या नवनवीन जाती विकसित केल्या जातात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी शास्त्रज्ञांनी सोयाबीनचे एक नवीन वाण विकसित केल आहे. सोयाबीनच्या या नवीन जातीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सोयाबीनचे हे नवीन वाण परभणी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले असून याला महाराष्ट्रात लागवडीसाठी मान्यता देखील प्रदान झाले आहे.

या नव्याने विकसित झालेल्या सोयाबीनच्या वाणाला एम ए यु एस 725 असं नाव देण्यात आल आहे. दरम्यान आज आपण या जातीच्या काही विशेषता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

सोयाबीनच्या एम ए यु एस 725 जातीच्या विशेषता खालीलप्रमाणे

सोयाबीनची ही नव्याने विकसित झालेली जात महाराष्ट्रासाठी अनुशासित करण्यात आली असून या जातीच्या लागवडीला मान्यता देण्यात आली आहे. अर्थातच महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना या जातीची पेरणी करता येणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित झालेली सोयाबीनची ही एक प्रगत जात आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे नवीन वाण अल्पकालावधीत काढणीसाठी तयार होणार आहे. जाणकार लोकांच्या मते ही नवीन जात अवघ्या 90 ते 95 दिवसात उत्पादन देण्यास तयार होणार आहे.

या जातीपासून हेक्टरी 35 ते 45 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार आहे. तसेच ही जात कीटकांना व रोगांना मध्यम प्रतिकारक राहणार आहे. साहजिकच या जातीपासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.