श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्याने कांद्याचे विक्रमी उत्पादन घेऊन मिळवले 11 लाख रुपयांचे उत्पन्न! सौर कृषी पंपाची मिळाली साथ

Ajay Patil
Published:
onion crop

शेतीमधून पिकांचे भरगोस उत्पादन हवे असेल तर प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थापन खूप योग्य पद्धतीने करावे लागते. पिक व्यवस्थापनामध्ये पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन इत्यादी गोष्टींना खूप महत्त्व असते. परंतु व्यवस्थापनाच्या या सगळ्या प्रकारांमध्ये पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असते.

पाण्याचे योग्य नियोजन व पुरवठा असल्याशिवाय पिकापासून उत्पादन मिळू शकत नाही हे देखील आपल्याला माहिती आहे. परंतु बऱ्याचदा विहिरींमध्ये पाणी असते परंतु वीज मात्र वेळेवर उपलब्ध  होत नसल्याने शेतकऱ्यांना विहिरीमध्ये पाणी असून देखील पिकांना गरजेवेळी पाणी देता येत नाही

व मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. परंतु या विजेचा लपंडावाची जी काही समस्या आहे त्यावर मात करत अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव या गावचे शेतकरी  भाऊसाहेब उबाळे यांनी सौर कृषी पंपाची मदत घेत कांद्याचे विक्रमी उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे.

 सौर कृषी पंपाच्या साह्याने घेतले कांद्याचे उत्पादन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या आढळगाव येथील शेतकरी भाऊसाहेब उबाळे यांची एकूण 13 एकर जमीन आहे परंतु या जमिनीमध्ये पीक घेताना मात्र त्यांना  इतर शेतकऱ्यांप्रमाणे विजेचा लपंडावाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत होता.

या समस्येला त्रासून त्यांनी  विहिरीवर तीन एचपीचे दोन सौर कृषी पंप बसवून घेतले व विजेच्या लपंडावापासून कायमची सुटका मिळवली. विशेष म्हणजे या सौर कृषी पंपाच्या मदतीने त्यांनी यावर्षी साडेपाच एकर क्षेत्रावर कांदा लागवड करून त्याचे यशस्वी उत्पादन देखील घेतले. त्यांनी सौर कृषी पंपाच्या मदतीने साडेपाच एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली व सौर कृषी पंपाच्या साह्याने पाण्याचे नियोजन झाल्यामुळे वेळेवर पाणी कांदा पिकाला मिळाले.

त्यामुळे साहजिकच कांद्याचे भरघोस उत्पादन त्यांना मिळाले व साडेपाच एकर मध्ये त्यांनी तब्बल १७५० गोणी कांद्याचे उत्पादन घेतले व सध्याच्या बाजारभावानुसार त्यांना अकरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असे देखील त्यांनी सांगितले.

कांद्याच्या उत्पादनातून किती मिळाला निव्वळ नफा?

याबाबत माहिती देताना भाऊसाहेब उबाळे यांनी म्हटले की, सौर ऊर्जा कृषी पंपांमुळे कांदा पिकाला वेळेवर पाणी  देणे शक्य झाले व त्यामुळे कांदा पिक जोमदार तयार झाले व एका कांद्याचे वजन सरासरी दोनशे ग्रॅम पर्यंत भरले. सध्या कांद्याच्या दरात घसरण झालेली असली तरी देखील त्यांना कांद्याची एकरी उत्पादन चांगले निघाल्यामुळे

एका एकरमध्ये दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले व खर्च वजा जाता साधारणपणे पूर्ण क्षेत्रामधून त्यांना पाच ते सहा लाखांचा नफा झाला आहे. हे सगळे सौर कृषी पंपामुळे शक्य झाले असे देखील त्यांनी म्हटले.

कारण विजेच्या लपंडावामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. परंतु  सौर कृषी पंपामुळे वेळेवर पाणी कांदा पिकाला मिळाल्यामुळे उत्पादनात घट  न होता त्यात वाढ झाली व चांगला आर्थिक नफा त्यांना मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe