Onion Price : महिनाभरानंतर जिल्ह्यात कांदा दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांची भाववाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Price : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे कांद्याच्या दरात जोरदार उसळी पहायला मिळेल असा अंदाज होता. परंतु, सोमवारी झालेल्या लिलावात कांदा दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांची दरवाढ पहायला मिळाली.

केंद्राने निर्यातीची मर्यादा वाढवली तरच थेट शेतकऱ्यांना फायदा होईल, अन्यथा ही दरवाढ तात्पुरती ठरेल, अशी भिती काही संघटनांनी व्यक्त केली.

नाशिक बरोबरच अहमदनगर जिल्ह्यातही कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. केंद्राने काही महिन्यांपूर्वी निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर दरात सातत्यान घसरण झाली.

दिड महिन्यांपूर्वी एक नंबर कांद्याचे दर १ हजार १०० रुपयांपर्यंत घसरल्याचे दिसून आले होते. त्यानंतर पुन्हा कांद्याचे दर अस्थीर राहिले. केंद्र सरकारने तीन महिन्यानंतर कांदा निर्यात बंदी उठवल्याची माहिती प्रसारीत झाल्यानंतर दरवाढ होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.

राहुरी तालुक्यतील वांबोरी उपबाजार आवारात सोमवारी ३ हजार ३३६ लाल कांदा गोणीची आवक झाली होती. त्यात एक नंबर कांद्याला १५०५ ते २००० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर दोन नंबर कांदा ९०० ते १५००, तीन नंबर २०० ते ९०० तर गोल्टी कांदा एक हजार ते १४०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला.

किसान सभेकडून निर्यातबंदीचा फायदा झालाच, तर व्यापाऱ्यांना होईल, तसेच निर्यातबंदीची मर्यादा उठवल्यानंतर त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याचा दिसेल असे सांगितले. महिनाभरानंतर सोमवारी दिसून आलेली दरवाढ हे चित्र आशादायी आहे.

20 टन निर्यात झाल्यास होईल शेतकऱ्यांचा फायदा
सध्या दिसून येत असलेली दरवाढ ही तात्पुरती आहे. सरकारने घोषणा केली की, भाव पडतात किंवा उसळी घेताता.

याचा फायदा शेतकऱ्यांना फारसा होत नाही. सरकारने अंशतः निर्यातीला परवानगी दिली. पण निर्यात दहा ते वीस लाख टनावर गेली तरच दर स्थिर राहून शेतकऱ्यांना चांगले भाव मिळतील. अजित नवले, किसान सभा.

११७३ गोणीला मिळाला दीड हजार रुपयांवर भाव
वांबोरी बाजार समितीत दाखल झालेल्या ३ हजार ३३६ गोणी कांद्यापैकी १ हजार १७३ गोणी कांद्याला प्रतिक्विंटल दिड हजारांवर भाव मिळाला.

त्यापैकी १८५ गोणी कांदाच २ हजारांपेक्षा अधिक दराने विकला गेला. लाल कांदा संपत आल्यामुळे भाव वाढ मिळूनही आवक मंदावल्याचे चित्र आहे.