Agriculture News : मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रात शेतीसाठी (Agriculture) शेतमजूर टंचाई प्रकर्षाने जाणवायला लागली आहे. वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीची कामे करण्यात मोठा अडथळा निर्माण होतो.
अशा परिस्थितीत आता शेतकरी बांधव शेतीकामासाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पीक काढणीसाठी (Crop Harvesting) देखील अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. शिवाय मजूर मिळाले तरीदेखील मजुरांना (Labour) पीक काढण्यासाठी अनेक दिवस लागतात.
अशा परिस्थितीत आता पीक काढणीसाठी वेगवेगळ्या यंत्रांचा उपयोग केला जात आहे. मित्रांनो यंत्राद्वारे काढणी केल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचतो. आजकाल पीक काढण्यासाठी अनेक प्रकारची यंत्रे उपलब्ध आहेत, परंतु कंबाईन हार्वेस्टर मशिन (Combine Harvester Machine) ही शेतकऱ्यांची पहिली पसंती आहे.
या यंत्राद्वारे पिकाची कापणी आणि मळणी एकाच वेळी करता येते. अशा परिस्थितीत आज आपण कम्बाईन हार्वेस्टर मशीनची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेण्याचा थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कम्बाइन हार्वेस्टर मशीनची वैशिष्ट्ये
- हे एक स्वयंचलित मशीन आहे जे ड्रायव्हरच्या मदतीने चालते.
- आवश्यकतेनुसार सर्व उपकरणे जोडलेली आहेत.
- यात इंजिन आणि चाक आहे, ज्यामुळे ते कुठेही फिरणे सोपे होते.
- या यंत्राच्या साह्याने पिकांची काढणी व मळणी एकाच वेळी केली जाते.
- यामुळे शेतकऱ्यांना शेतातच स्वच्छ धान्य मिळते. त्यामुळे धान्याचे कोठार बांधण्याची गरज नसते.
कंबाईन हार्वेस्टर मशीनचे फायदे
- गहू, भात, हरभरा, मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, मूग इत्यादी उभी पिके काढणी करण्यासाठी कंबाईन हार्वेस्टरचा वापर केला जातो.
- कापणीच्या सोबतच, ते मशीन दाणे वेगळे करते आणि गोळा करते. म्हणजेच कापणी आणि मळणी सोबतच होऊन जाते.
- हे शेतात आडवे आणि तिरपे पडलेले पीक देखील काढते.
- एका तासात 4 ते 5 एकर पीक कापून स्वच्छ धान्य शेतकऱ्यांना मिळतं असते. यामुळे कम्बाईन हार्वेस्टर मशीन शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वेळ आणि मेहनत वाचते.
कम्बाइन हार्वेस्टर मशीनची किंमत
- कंबाईन हार्वेस्टरची किंमत कंपनी आणि बाजारातील हार्वेस्टरचा आकार यावर ठरवली जाते.
- कंबाईन हार्वेस्टर मशीनची किंमत भारतात 10 ते 50 लाखांपर्यंत आहे.
- ते खरेदी करण्यासाठी सरकार त्यावर सबसिडीही देते. यासाठी शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडे संपर्क करावा लागणार आहे.